तीन महिने मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी...

फर्मागुडी अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th March, 05:36 pm
तीन महिने मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी...

फोंडा : फर्मागुडी येथे डिसेंबर (२०२३) महिन्यात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातातील जखमी दुचाकीस्वार मनोज ईलपे (मूळ-आंध्रप्रदेश) याचा बांबोळी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. जखमीवर गेल्या तीन महिन्यांपासून गोवा मेडिकल कॉलेजामध्ये उपचार सुरू होते.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ डिसेंबर रोजी फर्मागुडी येथे रात्रीच्यावेळी ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात घडला होता. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना सोमवारी (दि.२५) रात्री जखमी युवकाचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी डिसेंबरमध्ये झालेल्या या अपघातानंतर ट्रक‍ चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. निरीक्षक तुषार लोटलीकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.