आंssक छी !

Story: पुस्तकांच्या दुनियेत |
02nd March, 10:28 pm
आंssक छी !

कल्याणी झा यांचे हे पुस्तकं म्हणजे अगदी लहानग्या दोस्तांसाठी. पहिल्यांदाच वाचन करणार्‍यांसाठी, नवीन नवीन वचन शिकणाऱ्यांसाठी... आणि तसं बघायला गेलं सगळ्याच मुलांना आवडेल असं पुस्तक. आता हे पुस्तकाचं नाव वाचूनच खरं तर तुम्ही हसला असालच; पण हे पुस्तक ना खूप महत्त्वाचं आहे. वाचन करण्यासाठी त्या आधी पूर्व तयारी म्हणून या पुस्तकातल्या गोष्टी लहान मुलांना त्यांच्या ताई दादांनी किंवा आई बाबांनी किंवा कुणाही मोठ्यांनी सांगाव्यात आणि नंतर मुलं जेव्हा स्वतः ते पुस्तकं वाचू लागतील तेव्हा त्यांना ते अजूनच जवळचं वाटेल. कारण तुम्ही लहान मुलं जेव्हा एखादी गोष्ट ऐकता किंवा वाचता तेव्हा त्याच्यातील वेगवेगळ्या माणसांशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी तुम्ही आपोआप जोडले जाता, ती चित्रं तुम्हाला दिसू लागतात. या गोष्टी सांगताना त्यात दिलेले वेगवेगळे संदर्भ वाचून मुलांना नक्कीच अभिनय करून या गोष्टी सांगाव्यात. म्हणजे त्या गोष्टी त्यांना अजूनच समजतील. आणि गम्मत म्हणजे गोष्ट ऐकत आणि सांगत शिकणारी मुले स्वतः सुद्धा आपोपाप गोष्टी रचू लागतात. 

म्हणूनच तर, तुमच्या घरी, शेजारी किंवा नात्यात, तुमच्या मित्र मैत्रिणींच्या छोट्या भावंडांना हे पुस्तक नक्कीच भेट म्हणून द्या. त्यांना नक्कीच आवडेल आणि ते नवनवीन गोष्टीही शिकतील. 

पुस्तकाचे नाव : आंक छी!

लेखिका : कल्याणी झा

प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन 

एकूण पाने : ३६

किंमत : ८०/- रुपये