एक घास चिऊचा

बाळाच्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला काळजी वाटणे साहजिक आहे. दात येताना बाळ अस्वस्थ होते आणि त्यामुळे आईला काळजी वाटते. बाळाचे दात येतानाचा काळ कसा हाताळावा ह्याविषयी लोक तुम्हाला खूप सल्ले देतील, परंतु तरीही तुम्ही विश्वसनीय माहिती गोळा करायची.

Story: पालकत्व |
10th February, 12:23 am
एक घास चिऊचा

"अगं काय झालं एवढी वैतागतेस कशासाठी?" सासूबाईंचा प्रश्न. "सासूबाई अहो बाळ बघा ना, कसं करतोय? त्याला त्रास व्हायला लागला म्हणजे मला पण त्रास होतो ना?" सुनेचं उत्तर. "अगं पहिल्यांदाच आई झालीयेस तू. नवीन बदल स्वीकारायला वेळ तर जाईलच गं." अगदी खरं आहे. 

बाळाचा जन्म झाल्यावर विविध टप्पे असलेल्या एका सुंदर प्रवासास सुरुवात होते. प्रत्येक क्षण वेगळा असतो आणि तुम्ही प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकत असता. तुम्ही मातृत्वाच्या ह्या प्रवासात नवीन आहात, त्यामुळे बाळाच्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला काळजी वाटणे साहजिक आहे. दात येताना बाळ अस्वस्थ होते आणि त्यामुळे आईला काळजी वाटते. बाळाचे दात येतानाचा काळ कसा हाताळावा ह्याविषयी लोक तुम्हाला खूप सल्ले देतील, परंतु तरीही तुम्ही विश्वसनीय माहिती गोळा करायची.

तुमच्या बाळाचा पहिला दात येणे हा तुमच्या आईपणाच्या प्रवासातील सर्वात आनंदाचा टप्पा आहे. तथापि, ह्या कालावधीत सुद्धा बाळ अस्वस्थ होणार आहे आणि जेव्हा बाळ रडत असेल किंवा चिडचिडे होत असेल तर तुम्हाला त्याला शांत करणे जरुरीचे आहे. 

बाळाचे दात येण्यास केव्हा सुरुवात होते? 

प्रत्येक बाळाच्या वाढीचा स्वतःचा असा वेग असतो आणि तुमच्या बाळाला दात येण्यास सुरुवात होण्याचे असे कोणतेच विशिष्ट वय नसते.

बाळाला कुठल्या महिन्यात दात येतात?

बाळ जेव्हा ४ते ७ महिन्यांचे होते तेव्हा बाळाचा पहिला दात येण्यास सुरुवात होते. खूप कमी वेळा असे आढळते की बाळाच्या दात येण्याची सुरुवात बाळ एक वर्षांचे झाल्यावर सुरु होते. असेही काही वेळा आढळले आहे की जन्माच्या वेळेला बाळाचा पहिला दात दिसतो परंतु ह्या दोन्ही गोष्टी खूप दुर्मिळ आहेत.

बाळाची दात येण्याची सुरुवात लवकरात लवकर केव्हा होऊ शकते?

बाळाला दात येण्याची सुरूवात चौथ्या महिन्यात होते, परंतु तुमच्या बाळाला लवकरात लवकर म्हणजे तिसऱ्या महिन्यात सुद्धा दात येण्यास सुरुवात होऊ शकते. दुसऱ्या महिन्यात दात येण्यास सुरुवात झालेले बाळ सुद्धा तुम्हाला दिसू शकते. ज्या बाळांना लवकर दात येण्यास सुरुवात होते त्यांना जन्मतःच हिरड्यांवर छोटा उंचवटा असतो. त्यास इंग्रजीत 'Pre - teeth' असे म्हणतात. जर तुमच्या बाळाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात दात येताना आढळले तर घाबरून जाऊ नका ते अजिबात असामान्य नाही. हे महत्त्वाचे आहे की जेव्हा बाळ पोटात असते तेव्हा बाळाला दात विकसित होण्यास सुरुवात होते. किंबहुना, ह्या काळात हिरड्यांमधून दात बाहेर येऊ लागतो. बाळाला दात येण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर पहिला दात येतो, सगळे दात दिसू लागण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो.

बाळाला पहिले दात कुठले येतात?

बाळाला आधी खालचे दात येतात. खालच्या बाजून दोन दात पहिल्यांदा दिसू लागतात. जसजसे बाळाचे दात दिसू लागले म्हणजे बाळाने पुढील आयुष्यात कसं जगावं, वागावं याबद्दल संस्काररूपी पूरक खाद्य त्याला पुरवणं ही घरातील थोरामोठ्यांची वा बालकांची जबाबदारी असते.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली गोवा.