वाळपई : शस्त्रक्रियेद्वारे गाईच्या पोटातून १५ किलो प्लास्टिक काढले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 02:37 pm
वाळपई : शस्त्रक्रियेद्वारे गाईच्या पोटातून १५ किलो प्लास्टिक काढले

पणजी : वाळपई येथे एका गाईच्या पोटातून १५ किलो प्लास्टिक शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या काढण्यात आले. गायीच्या जीवावर आलेला धोका टळला आहे. सदर गाय रस्त्याच्या कडेला अन्न न खाता झोपलेली आढळून आली होती. त्यानंतर तिला श्रीराम गोशाळेत आणण्यात आले. 

वैद्यकीय तपासणीत गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. गोशाळा व्यवस्थापन व पशुवैद्यकीय विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून शस्त्रक्रिया करून तब्बल १५ किलो प्लास्टिक काढण्यात आले.

या घटनेनंतर गोशाळेच्या सदस्यांनी नागरिकांना रस्त्यांवर प्लास्टिक कचरा टाकू नये, असे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.