कुंकळ्ळी परिसरात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
कुंकळ्ळी परिसरात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

मडगाव : कुंकळ्ळी परिसरातील शेजारी शेजारी राहणार्‍या दोन १५ वर्षीय मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. तक्रारीनुसार कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

अज्ञात व्यक्तीकडून ४ जुलै रोजी आपल्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. तसेच आपल्या शेजारी राहणार्‍या दुसर्‍या एका १५ वर्षीय मुलीचेही अपहरण झालेले आहे, अशी तक्रार कुंकळ्ळी पोलिसांना प्राप्त झाली आहे. कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणासह गोवा बाल संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक किशोर वेळीप तपास करीत आहेत. 

हेही वाचा