सर्व पदे कंत्राटी : २२ जुलै रोजी पर्वरीत थेट मुलाखती
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : तंत्रशिक्षण संचालनालयात पीएमयू - सीएआरईएस योजने अंतर्गत शालेय कोडिंग आणि रोबोटिक्स शिकविण्यासाठी २० जागांवर भरती केली जाणार आहे. सर्व पदे टीच फॉर गोवा-फेलो (टीएफजी-एफ) जागेसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येतील. पदांसाठी २२ जुलै रोजी सकाळी ९.३० पासून पर्वरी येथील तंत्रशिक्षण संचालनालयात थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. या पदासाठी महिन्याला ४० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.
पात्र उमेवार १२ मे २०२६ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर काम करतील. या पदासाठी उमेदवार बी.ई., बी.टेक. किंवा एम.ई./एम.टेक किंवा एम.सी.ए किंवा एम.एस्सी असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगणक/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/मेकाट्रॉनिक्स शाखेमधील प्रथम श्रेणीसह शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराला ब्लॉक-बेस्ड/टेक्स्ट बेस्ड प्रोग्रामिंग, मायक्रोकंट्रोलर्स, अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एसटीआरईएएम बेस्ड अभ्यासक्रम शिकविण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला इंग्रजी आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे गोव्यातील १५ वर्षांचा रहिवासी दाखला आवश्यक आहे. दाखला नसलेले उमेदवार अपात्र ठरविण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ प्रमाणपत्रे/गुणपत्रिका, त्यांची छायांकित प्रत, बायो-डेटा घेऊन मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मुलाखत सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी हजर राहावे.
उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र अथवा माहिती चुकीची आढळून आल्यास उमेदवाराची फेलोशिप कोणत्याही वेळी रद्द करण्यात येईल. मुलाखतीस हजर राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा टीए, डीए दिला जाणार नाही, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.