बेती वेरे हॉटेलमधील मोबाईल चोरट्यास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd December 2023, 11:37 pm
बेती वेरे हॉटेलमधील मोबाईल चोरट्यास अटक

म्हापसा : बेती वेरे येथील हॉटेलमधील ग्राहकांच्या मोबाईल चोरी प्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी मोरीओ मिनीन फर्नांडिस (२३, रा. चिंचणी, सासष्टी) याला अटक केली. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध कुंकळ्ळी व दक्षिण गोव्यातील इतर पोलीस स्थानकांत अनेक गुन्हे नोंद आहेत.

बेती येथील हॉलिडे व्हिलेज हॉटेलचे मालक जोस बार्रेटो यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादींच्या हॉटेलच्या आवारात काही पर्यटक झोपत असत. या पर्यटकांचे मोबाईल संशयित चोरून नेत होता.

शुक्रवारी रात्री संशयिताने अशीच चोरी केली होती. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी संशयिताला शनिवारी पकडले. संशयिताविरूद्ध भा.दं.सं.च्या ३७९ व ५११ कलमाअंतर्गत चोरीचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. संशयिताकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत तळकर, कॉन्स्टेबल नीतेश गावडे, अजय कोरगावकर व गौरेश लोंढे या पथकाने ही कामगिरी केली. 

हेही वाचा