पणजी : राज्यात १ कोटींहून अधिक महागड्या गाड्यांची नोंदणी स्वस्त होणार आहे. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारसाठी, नोंदणी शुल्क १५ लाख निश्चित करण्यात आले आहे. कितीही महागडी कार खरेदी केली तरी शुल्कासाठी फक्त १५ लाख रुपयेच मोजावे लागणार आहेत. महागड्या गाड्यांची नोंदणी महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात स्वस्त होणार आहे.
महागड्या गाड्यांची नोंदणी शुल्क १५ लाख रुपये ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. इतर राज्यांमध्ये महागड्या गाड्यांचे कमी नोंदणी शुल्क होते. त्यामुळे गोव्यात महागड्या गाड्यांची नोंदणी थांबली. गोव्याच्या तुलनेत शेजारील महाराष्ट्रात नोंदणी शुल्क कमी होते. त्यामुळे महाराष्ट्रात महागड्या गाड्यांची नोंदणी अधिक झाली. आता नोंदणी शुल्काची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत मर्यादित केल्याने आता महाराष्ट्रापेक्षा गोव्यात महागड्या कारची नोंदणी करणे स्वस्त होणार आहे. महाराष्ट्रात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वाहनांसाठी १३ टक्के नोंदणी शुल्क आहे. तथापि, शुल्काची कमाल रक्कम २० लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे.
१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी १५ टक्के नोंदणी शुल्क आहे. ४ कोटींच्या कारसाठी ५६ लाख रुपये लागत. आता त्यांना १५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. ३ कोटी रुपयांच्या कारचे पूर्वीचे शुल्क ४२ लाख रुपये होते. आता ४२ लाखांऐवजी १५ लाख रुपये मोजावे लागतील.