पणजी : मडकई येथील नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी भाविकांनी दान केलेले पैसे, सोने, साडी, तसेच इतर वस्तूंची जबाबदारी प्रशासक किंवा त्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलीसफाटा तैनात करण्याचा निर्देश फोंडा येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. याबाबतचा आदेश न्या. शैरीन पाॅल यांनी दिला आहे.
मडकई येथील नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव १ ते २० डिसेंबरपर्यंत साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत स्थानिक आणि महाजन समितीमध्ये वाद असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळी काही होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करावेत. तसेच जत्रोत्सव निमित्ताने भाविकांनी दान केलेले पैसे, सोने, साडी तसेच इतर वस्तूंची जबाबदारी प्रशासक किंवा त्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. यासंदर्भात फोंडा येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्देश दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे.