हिवाळ्यात बॅगमध्ये काय ठेवाल?

Story: लावण्यव 'ती' |
25th November 2023, 03:22 am
हिवाळ्यात बॅगमध्ये काय ठेवाल?

आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपण आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. पण जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा या गोष्टी शक्य होत नसतात. खास हिवाळ्याच्या दिवसात त्वचेकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागते म्हणून आपल्या रोजच्या बॅगमध्ये काय ठेवावे याचा विचार करणे गरजेचे असते. म्हणून या हिवाळ्याच्या दिवसात आपल्या बॅगमध्ये असाव्यात अश्या गोष्टी. 

मॉइश्चरायझर

तेलकट त्वचा असलेल्या लोकांनाही कधीकधी असे वाटू शकते की, हिवाळ्यात त्यांचा चेहरा कोरडा होत आहे, विशेषतः जेव्हा ते बाहेर पडतात. त्यामुळे, तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडू शकता आणि ते तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता. बॅगमध्ये ठेवण्यासाठी शक्यतो लहान पॅकची निवड करा. जेणेकरून तुम्हाला प्रवासात किंवा बाहेर कुठेही जाताना बॅग कॅरी करायला सोपे जाईल.

लिप बाम

फाटलेले आणि कोरडे ओठ अतिशय वाईट दिसतात. फाटलेल्या ओठांवर कधीही लिपस्टिक लावता येत नाही आणि ते वेदनादायक देखील असतात. त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या पिशवीत लिप बाम ठेवावे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे ओठ कोरडे होत आहेत, तेव्हा तुम्ही त्वरीत लिप बाम लावू शकता.

सनस्क्रीन

ऋतू कोणताही असो, सनस्क्रीन नेहमीच त्वचेवर लावली पाहिजे. हिवाळ्यात देखील तुमच्या त्वचेवर अतिनील किरणे तीव्र ठरू शकतात. बाहेर पडताना तुमच्या त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन पुन्हा पुन्हा लावत राहणे गरजेचे असते.

पेट्रोलियम जेली

हिवाळ्यात फक्त आपला चेहराच नाही तर शरीराचा भागही कोरडा पडतो. त्वरीत कोरडेपणापासून मुक्त होण्यासाठी आपण पेट्रोलियम जेली लावू शकता.

हायड्रेटिंग मिस्ट

तुमची त्वचा नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी आणखी एक सोपा हॅक म्हणजे नेहमी हायड्रेटिंग मिस्ट बाळगणे. अशा मिस्ट्सच्या लहान लहान बाटल्या हल्ली सहज उपलब्ध असतात.


  • शिल्पा च्यारी
  • लेखिका फॅशन डिझायनार आणि ब्युटीशियन आहेत.