संशयित अफझल खानला बलात्कार करण्याची विकृती!

म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन फेटाळला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 12:34 am
संशयित अफझल खानला बलात्कार करण्याची विकृती!

म्हापसा : संशयित आरोपी हा विवाहित व सहा महिन्याच्या मुलाचे वडील असतानाही मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत आहे. संशयिताला बलात्काराचा गुन्हा करण्याची सवय असल्याचा निष्कर्ष नोंदवत म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित अफझल नूरअहमद खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
हडफडे येथे हॉटेलवर मैत्रिणीसोबत सहलीला गेलेल्या १८ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी संशयित अफझल उर्फ अल्बाझ नूरअहमद खान (२१, रा. साळगाव व मूळ कर्नाटक) यास गेल्या १ ऑगस्ट रोजी अटक केली होती.
हा बलात्काराचा प्रकार ३० जुलै रोजी सायं. ४.४५ ते ५.५० या वेळात घडला होता. फिर्यादी युवती आपल्या एका मैत्रिणीसोबत हडफडे येथे सहलीसाठी गेली होती. तेथील एका रिसॉर्टच्या खोलीत त्या दोघी वास्तव्यास होत्या. तिथे त्या मैत्रिणीचा संशयित प्रियकर आला व त्यांच्यात सहभागी झाला.
घटनेच्यावेळी संशयिताने आपल्या प्रियसी युवतीला काही वस्तू आणण्यासाठी बाहेर दुकानावर पाठवले. ती खोलीतून बाहेर जाताच संशयित पीडितीच्या बेडरूममध्ये गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोन दिवसांनी १ ऑगस्ट रोजी पीडितेने तक्रार नोंदवताच भा.दं.सं.च्या ३७६ कलमांतर्गत गुन्ह्याखाली पोलिसांनी संशयिताला पकडून अटक केली होती.
त्यानंतर दि. २ ऑगस्ट होती पोलिसांनी संशयितावर अजून एक भा.दं.सं.च्या ३७६, गोवा बाल कायदा आणि पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता. अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संशयिताने बलात्कार केला होता. वरील प्रकरण समोर आल्यानंतर पीडितेने समोर येत तक्रार गुदरली होती.
संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण, म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी वरील निष्कर्ष नोंदवत हा जामीन अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा