हणजूण, वागातोरमधील आस्थापनांविरोधात कारवाई

ध्वनी प्रदूषण : म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th May 2023, 12:31 am
हणजूण, वागातोरमधील आस्थापनांविरोधात कारवाई

म्हापसा : हणजूण पोलिसांनी कॅफे ला म्यूझिका (वागातोर) व झोझो बार (हणजूण) या आस्थापनांच्या मालक व व्यवस्थापकांविरूद्ध ध्वनी प्रदूषण गुन्ह्याखाली म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

गेल्या १२ जानेवारी रोजी हणजूण - कायसूव पंचायत तलाठी गौरेश नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वागातोर येथील कॅफे ला म्यूझिका या क्लबवर छापा टाकला होता. त्यावेळी प्रमाणाबाहेर संगीत वाजवले जात असल्याचे आढळून आले होते.

तर १३ जानेवारी रोजी पोलिसांनी हणजूण येथील झोझो बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्टवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सावळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्णकर्कश आवाजात वाजणारी संगीताची उपकरणे जप्त केली होती.

या दोन्ही प्रकरणी कॅफे ला मुझिकाचे मालक विजय अरोरा व सुदीप्ता घोष आणि झोझो बारचे मालक सुभाष बजाज, मोहक बजाज व व्यवस्थापक जयचंद रामोला यांच्या विरूद्ध ध्वनी प्रदूषण व पर्यावरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणी आता पोलिसांनी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. 

हेही वाचा