गोमंतकीय कोंकणी रंगभूमीसाठीचे योगदान

२०१२ हे वर्ष कोंकणी रंगभूमीचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. हा महोत्सव गोवा तसेच कोंकणी भाषिक प्रदेशात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. हा महोत्सव रंगभूमीची पुढील दिशा ठरवण्यासाठी, चिंतन-मनन करण्यास आणि सर्व नाट्यकर्मींना उत्तेजन देणारा ठरला.

Story: कोंकणी रंगभूमी | श्रीधर कामत बांबोळकर |
27th May 2023, 11:21 pm
गोमंतकीय कोंकणी रंगभूमीसाठीचे योगदान

आतापर्यंत चिकित्सक अभ्यासकातून कोंकणी रंगभूमी 'नाटककार प्रधान' राहिली आहे असे दिसून येते. 'पुंडलिकांची', 'विष्णू वाघांची', 'दत्ताराम बांबोळकरांची', 'प्रकाश वझरीकरांची' नाटके असेच आपण म्हणत आलोय. मराठीत 'तेंडुलकरी नाटके', 'कानेटकरी नाटके' असे आपण म्हणतो. पण ज्या तऱ्हेने आम्ही रतन थिय्यम, कारंथ, हबीब तन्वीर यांची रंगभूमी म्हणतो तशी विजया मेहता, दामू केंकरे यांची रंगभूमी म्हणत नाही. शतक महोत्सवी वर्षात याच्यावरही विचार मंथन व्हायला पाहिजे होते.

नाट्यकला एक सृजनशील अभिव्यक्तीचे रूप, ज्यात प्रामुख्याने संवादमुलक आलेख किंवा कथा नटांच्या मार्फत बाकीच्या रंग शिल्पींच्या आधारे कुठल्याही रंगमंचावर रंगगृहात प्रेक्षकांच्या समोर सादर केले जाते. हे सादरीकरण कधी संवादावर भर देणारे, कधी संगीतावर, कधी नृत्यावर, तर कधी सर्वांचे मिश्रण व एक-दोन यांचे एकत्रित रूप, कधी ते आधुनिक तंत्रांचा वापर करून नाट्यगृहात सादर केले जाते, तर कधी मोकळ्या आकाशाखाली. 

नाटकाच्या रचनेची प्रक्रिया लेखकाने लिहून झाल्यावर संपत नाही. रंगमंचावर सादर झाल्यावर नाटकाचा कस ठरतो. रंगमंचावर नटांच्या मार्फत प्राणप्रतिष्ठा आणल्याशिवाय नाटकाला पूर्णता येत नाही म्हणून रंगमंचापासून वेगळे काढून नाटकाचे मूल्यांकन व त्याच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार पूर्ण होत नाही. नाटक हे प्रेक्षकांसाठी असते. प्रेक्षकांच्या हजेरीत त्याचे रूपांतर प्रयोगात होते. कलाकारांचा समूह नाट्यसंहितेचे रूपांतर प्रयोगात करतो आणि म्हणून कथावस्तू बरोबरच प्रयोगाकडे संबंधित इतर घटकांचा नट, कलाकार आणि प्रेक्षक यांचा विचार कलाकाराला करावा लागतो. नाट्य लेखकासारखाच दिग्दर्शक, अभिनेता, पथ्यकार, संगीतकार, वेशभूषाकार, रंगभूषाकार, प्रकाशयोजक या सगळ्या कलाकारांचा सहभाग नाटकात तितकाच महत्त्वाचा ठरतो. रंगभूमी ही एकट्याची कला नव्हे, तो एक समूहाविष्कार.  भरतमुनींनी नाट्यकलेला 'दृक-श्राव्य-काव्य' असे म्हटले आहे.

कोंकणी रंगभूमीला योगदान दिलेले दिग्दर्शक

कोंकणी रंगमंचावर दिग्दर्शनात प्रकाश थळी, दिगंबर सिंगबाळ, श्रीधर बांबोळकर, विजय थळी, दिलीपकुमार नाईक, राजू नायक, दिलीप देसाई, अवधूत वा. कामत, अवधूत कामत, राजीव शिंदे, राजेंद्र तालक, अविनाश च्यारी, प्रमोद महाडेश्वर, प्रेमानंद पोळे, रवींद्र आमोणकर, भरत नायक, अजित केरकर, राजदीप नायक, एकनाथ नायक, श्रीनिवास उजगावकर, कलानंद बांबोळकर आदींचे योगदान आहे.

कोंकणी रंगभूमीसाठी योगदान दिलेले पुरुष आणि स्त्री नट

अभिनयाच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्यांची पुष्कळ नावे घेता येतील. पण आपली स्वतःची अशी खासियत दाखवणारे अभिनेते म्हणजे भरत नायक, अजित केरकर, रघुनाथ साकोर्डेकर, राजीव हेदे, महादेव नायक, अवधूत कामत, विजयकुमार कामत, पुरुषोत्तम सिंगबाळ, अशोक भोंसले, प्रकाश आचार्य, गुरुदास बांबोळकर, रवींद्र नमशिकर, रामदास नायक, अरुण गावणेकर, उमेश नायक, मोहन चांदेलकर, विजय पै खोत, अजित कामत, नामदेव फडते, शाबा कुडतरकर, राधाकृष्ण बांबोळकर, प्रवीण बांदोडकर, हिरु नायक, प्रदीप नायक, दीपक आमोणकर, संतोष नमशीकर, सुदन कामत, अनिल रायकर, केतन भट, प्रणव बीचे, राजेश नायक, व्यंकटेश गावणेकर, महेश बांबोळकर, रोहिदास नायक, शंभुनाथ केरकर, कलानंद बांबोळकर, सुशांत नायक आदि पुरुष नट.

स्त्री अभिनेत्रींमध्ये नावे घ्यायची तर नूतन नमशिकर, सुकांति गावडे, विनंती कांसार, मीना काकोडकर, कामिनी घोडे, ज्योती नावेलकर, गीता खरंगटे, स्वाती कंटक, नियती हेदे, कुंदा पै, ज्योती नावेलकर, रत्ना दिवकर, राजश्री गावणेकर, ज्योती कुंकळकर, ज्योती सावंत, शोभा प्रभुदेसाई, प्रशांती तळपणकर, रूपा च्यारी, रूपा शिगांवकर, गौरी कामत, विजेता नायक, शोधन बांबोळकर, अकूमा नंदुरमठ, शर्मिला बोरकर, स्मिता सरदेसाई, सुमित्रा च्यारी, आशा सुखठणकर, शांती तेंडुलकर, निशा गावणेकर, शिल्पा बखले, अपर्णा जठार, नीता देसाई, गौरी गावणेकर, सुचिता नार्वेकर, तन्वी बांबोळकर, खुशबू कवळेकर, रूपाली नाईक अशा काही अभिनेत्री आहेत.

नेपथ्यरचना कलात्मक आणि संहितेच्या मागणीप्रमाणे निर्माण करण्याचे योगदान कोंकणी रंगभूमीला लाभले आहे. त्यातले काही नेपथ्यकार असे आहेत - दिलीप धामस्कर, दयानंद भगत, सुनील नायक, विनोद तिळवे, शशांक शिंक्रे, प्रवीण बांदोडकर, मंगलदास च्यारी, दादा दिवकर, जवाहर बर्वे, विजयकांत नमशीकर, राजेंद्र तालक, निलेश महाले, राजा खेडकर, हेमंत कासार, आदी.

पार्श्वसंगीत क्षेत्रात योगदान

पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात संगीतकारांनी दिलेले योगदान कोंकणी रंगभूमीची एक खासियत आहे. पूर्णानंद च्यारी यांनी प्रादेशिक संगीताचे दिलेले स्वर, ताल, लय आणि गायन रंगभूमी सबळ करणारे ठरलेले आहे. रवींद्र आमोणकर, प्रकाश थळी, जवाहर बर्वे, साईश देशपांडे यांनी 'स्टॉक म्युझिक' वापरून बहुतेक पार्श्वसंगीत दिले. नितीन म्हाड्डोळकर, मॅथ्यू फर्नांडिस, उदय तिळवे, उल्हास वेलिंगकर, रामदास कूर्पासकर, दिगंबर गावडे, विश्वास च्यारी, तानाजी गावडे, प्रसन्न कामत, तारानाथ होळगड्डे आदींचे योगदान या क्षेत्रात महत्त्वाचे आहे.

वेशभूषा - रंगभूषा योगदान

वेशभूषा आणि रंगभूषा ही सुद्धा नाट्यकलेची महत्त्वाची अंगे. दादा दिवकर, दास कवळेकर, प्रेमानंद पोळे, आत्माराम सावर्डेकर, राणी सदरे आणि कला अकादमीच्या नाट्य विद्यालयाच्या माजी संचालिका पद्मश्री जोसळकर यांचे या क्षेत्रात अभ्यासपूर्ण काम आहे.

तनुजा केरकर, गीता बांबोळकर, वीणा गावणेकर, सुचिता नार्वेकर, नंदेश वस्त, मोहनदास कामत, संतोष केरकर आदी कलाकारांनी वेशभूषेच्या क्षेत्रात नाव कमविले आहे. 

प्रकाश योजनेत योगदान 

प्रकाश योजनेत आपले कौशल्य दाखविणारे तंत्रज्ञ म्हणजेच उल्हास फुलारी, सुभाष केंद्रे, सतीश गवस, अशोक नायक, सुशांत नायक, निलेश महाले, प्रेमानंद पोळे, राजेंद्र तालक, राजीव शिंदे, अविनाश च्यारी, विजयकुमार नाईक, श्रीनिवास उसगावकर, कलानंद बांबोळकर.

दहा पंधरा वर्षांच्या अनुभवातून नवीन शोध घेण्याची प्रक्रिया चालूच असते. त्याप्रमाणे कोंकणी रंगभूमीचे स्वरूप काळानुसार कमी अधिक प्रमाणात बदलत राहणार. त्या त्या काळातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा परिणाम; तसेच विज्ञानाचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण या प्रक्रियेकरिता कोंकणी रंगभूमीचा मूळ मातीचा गंध, रंग उडून जाणार नाही याची काळजी कोंकणी साहित्यिक रंगकर्मी आणि प्रेक्षकांनीही घेणे गरजेचे आहे.

 कोंकणी भाषेचा संघर्ष आणि नाट्य चळवळीचा विचार केल्यास जे काही निर्माण झालेले आहे ते फार थोड्या काळात झालेले आहे. 'नाटक' म्हणजे लोकांच्या अभिरुचीवर टिकणारे साहित्य आणि प्रेक्षकांकडे संवाद साधण्याचे प्रभावी असे जिवंत माध्यम. गोव्याची लोकभाषा आणि राज्यभाषा कोंकणी म्हणून आमच्या भाषेतून स्थानिक प्रश्न आणि जीवन जेवढे आपण व्यक्त करू तितकी ती नाटके प्रभावी होतील. कोंकणीतून नाट्यनिर्मिती करून कोंकणी अस्मिता आणि परंपरा पुढे नेण्यासाठी नवीन नवीन कल्पना, तसेच लेखक व सृजनशील रंगकर्मी रंगभूमीवर यायला पाहिजेत. तरच भविष्यात अस्मितेच्या रक्षणासाठी कोंकणी रंगभूमीचे योगदान सदैव चालूच राहणार.