लॉंच होतेय नवीन यामाहा आर 15 डार्क नाईट व्हेरीयंट

Story: टेक्नो जगतात | ऋषभ एकावडे |
27th May, 11:16 pm
लॉंच होतेय नवीन यामाहा आर 15 डार्क नाईट व्हेरीयंट

यामाहा जगभरात स्पोर्ट्स बाइक बनवण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. स्टाईल आणि लूकमुळे याला अधिक पसंती दिली जाते. भारतात कंपनीने आर १५ बाईक लाँच केली होती, तीही लोकांच्या बजेटमध्ये, त्यामुळे तिची मागणी चांगली आहे. अलीकडच्या काळात ऑटोमेकरने 'आर१५ व्ही४'चे 'डार्क नाईट एडिशन' लॉन्च केले आहे. भारतीय बाजारपेठेत या मोटरसायकलची किंमत १.८२ लाख रुपये आहे. 

यामाहा आर १५ व्ही ४ डार्क नाईट एडिशन

'यामाहा आर१५ व्ही ४ डार्क नाईट' एडिशनमध्‍ये सोनेरी हायलाइट्ससह ब्लॅक बॉडी पेंटचा वापर केला आहे जो याला खूप शक्तिशाली लूक देतो. बाइकच्या अलॉय व्हीलला गोल्डन पेंट आणि चाकांवर गोल्डन हायलाइट्स मिळतात. सध्या, 'आर १५ व्ही ४' चार रंगांमध्ये उपलब्ध आहे - लाल (रु. १.८१/- लाख), डार्क नाइट (रु. १.८२/- लाख), निळा आणि 'इंटेन्सिटी व्हाइट' (रु. १.८६/- लाख)

इंजिन आणि पॉवर

'आर १५ व्ही ४ डार्क नाईट' एडिशनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पॉवरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे स्टँडर्ड मॉडेलप्रमाणेच वैशिष्ट्ये आणि डिझाइनसह येते. इंजिनवर येत असताना, 'आर १५ व्ही ४ डार्क नाईट एडिशन' हेच ​​१५५सीसी लिक्विड कूल्ड, ४ व्हॉल्व्ह इंजिन वापरते. जे १८.४hp पॉवर आणि १४.२Nm टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स स्लिपर क्लच आहे.

सस्पेंशन आणि फ्रेम

कंपनीने 'आर १५ व्ही ४' साठी डेल्टा बॉक्स फ्रेमचा वापर केला आहे, ज्यामुळे बाइकला मजबूत स्टेबिलिटी मिळते. बाइकला आरामदायी बनवण्यासाठी, याला यूएसडी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन युनिट मिळते. सुरक्षिततेसाठी ही बाईक ड्युअल डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएसने सुसज्ज आहे.

स्पर्धा कुणाशी?

'यामाहा आर १५ व्ही ४' ची स्पर्धा भारतीय बाजारपेठेत 'सुझुकी गिक्जर एस एफ २५०' (रु.१.९२/- लाख ते रु. २.०१/- लाख) आणि 'केटीएम आर सी २००' (रु. २.१८ लाख) सोबत आहे. या सेगमेंटमध्ये 'यामाहा आर १५ व्ही ४'ला टक्कर देण्यासाठी हीरो मोटो कॉर्प लवकरच पूर्ण-फेअर 'करिझ्मा एक्स एम आर' लाँच करू शकते.