उद्या बाजारात येणार ७५ रुपयांचे नाणे

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th May 2023, 12:23 am
उद्या बाजारात येणार ७५ रुपयांचे नाणे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते रविवार, २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ७५ रुपयांचे नाणे आणि स्टॅम्पचे लोकार्पण करण्यात येणार आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी नाण्याविषयी नोटिफिकेशन जारी केले. त्यांनी सांगितले की हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत तयार होत आहे.
हे नाणे गोल असेल, ज्याचा व्यास ४४ मिमी ठेवण्यात आला आहे. त्याच्या बाजूला २०० सेर्रेशन्स असतील. हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंकच्या मिक्सरपासून बनवले जात आहे.
नाण्याच्या एका बाजूला अशोकस्तंभ असेल, ज्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरीत भारत आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ असे लिहिलेले असेल. नव्या नाण्यावर रुपयाचे चिन्ह असेल आणि सिंहाच्या खाली ७५ रुपये लिहिलेले असतील. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसद परिसराचे चित्र असेल. छायाचित्राच्या वर देवनागरीत ‘संसद संकुल’ आणि खाली इंग्रजीत 'पार्लियामेंट कॉम्प्लेक्स' असे लिहिलेले असेल.

हेही वाचा