मोरजी किनाऱ्यावर कारमधून फेरफटका, पर्यटकाला अटक

पुढील कारवाईसाठी संशयित पेडणे पोलिसांकडे


26th May 2023, 11:40 pm
मोरजी किनाऱ्यावर कारमधून फेरफटका, पर्यटकाला अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पेडणे : मोरजी किनाऱ्यावर समुद्राजवळून कार चालवणाऱ्या तेलंगणाच्या पर्यटकाला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.

मोरजी किनारी शुक्रवारी सकाळी साहाय्यक उपनिरीक्षक अशोक गवंडी यांच्यासह शिवोली किनारा सुरक्षा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल गोविंद शेट्ये हे दृष्टी लाईफ गार्ड टॉवर, मोरजी येथे ड्युटीवर होते. त्यांना होंडा सिटी कार (क्र. एपी २८ एटी ९९१६) किनाऱ्यावर फिरताना दिसली. लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ वाहनचालक नरेल्ला सुरेश (३२, रा. हैदराबाद) याला ताब्यात घेतले. चालक व वाहन यांना पुढील कारवाईसाठी पेडणे पोलिसांच्या ताब्यात ‌िदले. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी वाहन चालकाला अटक केल्याची माहिती दिली.