कळंगुटमध्ये माती टाकणारा ट्रक जप्त

मामलेदार कार्यालयाची धडक कारवाई


27th May, 12:38 am
कळंगुटमध्ये माती टाकणारा ट्रक जप्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता             

म्हापसा : रस्त्याच्या शेजारी टाकाऊ साहित्य आणि मातीचा भराव टाकणाऱ्या प्रकाराविरुद्धच्या मोहिमेद्वारे तिसऱ्या दिवशी मामलेदार कार्यालयाने कळंगुट  येथे ट्रक पकडून जप्त केला.             

परबोवाडा कळंगुट येथे रस्त्याशेजारी शेतजमिनीत ट्रकातून मातीचा भराव टाकला जात असल्याची माहिती मामलेदार कार्यालयाला मिळाली. त्यानुसार तलाठी शुभम साखळकर यांनी घटनास्थळी धाव घेत सदर ट्रक पकडला व कळंगुट पोलिसांना पाचारण करून पुढील कारवाईसाठी हा ट्रक त्यांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी हा ट्रक जप्त करून ट्रक चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.             

बुधवारपासून मामलेदार कार्यालयाने महामार्ग व स्त्याच्या शेजारील जमीन मातीचा भराव व टाकाऊ साहित्य टाकून बुजवणाऱ्या बेकायदा प्रकाराविरुद्ध मोहीम राबवली आहे. त्यानुसार बुधवारी व गुरुवारी म्हापशात महामार्गाशेजारी मातीचा भराव टाकणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले होते. आता शुक्रवारी कळंगुटमध्येही एक ट्रक जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा