स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगोपचार

Story: संतुलन मंत्रा । अंजली पाटील |
18th November 2022, 11:06 Hrs
स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगोपचार

आजच्या धावपळीच्या जीवनात इथं प्रत्येकालाच कसला न कसला तरी स्ट्रेस किंवा ताणतणाव हा असतोच. हा ताणतणाव कसा कमी करावा याचे मात्र उत्तर आपल्याकडे नसते. कुणाला कामाचा स्ट्रेस, तर कुणाला अभ्यासाचा स्ट्रेस; कुणाला आपल्या आजारपणाचा स्ट्रेस, लहान मुलांना शाळेत जाण्याचा स्ट्रेस असे एक ना अनेक प्रकारचे स्ट्रेस आहेत व ह्याचे आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकत नाही म्हणून मग भविष्यात आपल्याला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. वेळीच जर आपण आपल्या स्ट्रेसचे मॅनेजमेंट केले तर पुढचे गंभीर परिणाम टाळता येतात.

स्ट्रेसची मुख्य कारणे :

एकटेपणा

नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स

शारीरिक समस्या

जोडीदाराबरोबर न पटणे

मुलांबरोबर न पटणे

आर्थिक समस्या

सामाजिक वातावरण

जवळच्या व्यक्तीचे निधन

घटस्फोट

वाईट संगत

ड्रग किंवा दारूची सवय

सेक्स लाईफमध्ये प्रॉब्लेम्स.

अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो. पण आपल्याला ते समजत नाही व जेव्हा समजते तेव्हा फार उशीर झालेला असतो. यावर काय उपाय आहेत किंवा आपण काय उपाय करावेत हे माहीत नसल्यामुळे समस्या वाढतच जातात.

स्ट्रेसची मुख्य लक्षणे :

प्रचंड वेगाने मूड बदलणे

प्रत्येक वेळी भीती वाटणे

विसर पडणे

आत्मविश्वास कमी होणे

नेहमीपेक्षा कमी किंवा अधिक खाणे

जास्त प्रमाणात दारू पिणे

शारीरिक थकवा 

फ्रेंड्स व नातेवाईकांपासून दूर राहणे

कामांमध्ये लक्ष नसणे

कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष नसणे

वागणुकीमध्ये बदल होणे

 ही सर्व आपण स्ट्रेसमध्ये आहात याची लक्षणे आहेत. त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे.

ताणतणावावर योगोपचार :

योगोपचारामध्ये पंचकोशात्मक विचार करून उपचार केला जातो. आपले शहरी हे पाच कोषापासून बनलेले आहे.

१. अन्नमय कोष

२. प्राणमय कोष

३. मनोमय कोष

४. विज्ञानमय कोष

५. आनंदमय कोष

अन्नमय कोषासाठी संतुलित आहार व व्यायामाची आवश्यकता असते. प्राणमय कोषासाठी प्राणायाम. मनोमय कोषासाठी चांगले प्रसन्न मन. विज्ञानमय कोषासाठी चांगले ज्ञान हे आवश्यक आहे. आनंदमय कोषासाठी सुसंगती गरजेची आहे. 

काही उपयुक्त योगासने:

१. शशांकासन

२. पद्मासन

३. वृक्षासन

४. शवासन

५. योगनिद्रा

६. मकरासन

७. बालासन

अशी सोपी आसने करावीत त्याचबरोबर थोडे सोपे प्राणायम करावेत:

भ्रामरी प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम

ओमकार जप.

सूर्यनमस्कार तर सर्वच समस्यांवर रामबाण उपाय आहे त्याचाही सराव करावा.

हे काही सोपे उपाय आहेत. त्याचा अभ्यास करावा व वाटल्यास समुपदेशकाचा सल्ला घ्यावा व गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला देखील घ्यावा. आपल्या आरोग्य संबंधित समस्या असतील तर निष्काजीपणा करू नये कारण नेहमी लक्षात ठेवा 'आरोग्य हीच खरी धनसंपदा'.