नारायण पेठ साडी

नारायण पेठ साडीच्या उत्पत्तीबद्दलची सर्वात प्रसिद्ध कथा ही थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित आहे. १६३० मध्ये, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आंध्र प्रदेश राज्याच्या प्रदेशात तळ ठोकला होता, जे मराठा राज्य होते. या प्रदेशात नारायण पेठ याच नावाचा छोटासा परिसर. जेव्हा महाराजांनी हा प्रदेश सोडला तेव्हा मराठा साम्राज्यातील काही विणकर मागे राहिले आणि या साड्या विणत राहिले ज्याला नारायण पेठ साडी म्हणून ओळखले जाते.

Story: फॅशन पॅशन । प्राजक्ता पुंडलिक गांवकर |
30th September 2022, 10:05 pm
नारायण पेठ साडी

या साड्यांवर मराठा शैलीचा मोठा प्रभाव आहे कारण तिची उत्पत्ती तिथेच आहे. कापूस आणि रेशमी धागे किंवा कापूस किंवा रेशमाच्या मिश्रणाने जरीच्या मिश्रणाने बनवली जाते. नारायण साड्या केवळ हातमागावर विणल्या जातात मशीनवर नाही. ते विविध अद्वितीय रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये आणि पल्लूमध्ये येतात. नारायणपेठ साड्या नेहमी कॉंट्रास्ट बॉर्डरसह येतात. 

नारायण पेठेतील साडीची पारंपरिक रचना म्हणजे साडीच्या मुख्य भागाला बॉर्डर आणि पल्लू हे  लहान भौमितिक डिझाईन्ससह कॉन्ट्रास्ट रंगात असतात. सामान्यतः बॉर्डरच्या काठावर त्रिकोण असतात. या साड्यांचे फॅब्रिक हलके असते आणि साडीत वाहणारी नाजूक जरी सुंदर दिसते. या साड्या सर्व सणांसाठी, उत्सवांसाठी तसेच कोणत्याही औपचारिक कार्यांसाठी योग्य आहेत.

दागिने

नारायणपेठ साड्या वेगवेगळ्या रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये येतात, जेव्हा तुम्ही या साड्या नेसाल आणि दागिन्यांशी जुळवून घ्यायचे असेल तेव्हा साडीच्या बॉर्डरशी जुळणारे दागिने निवडा. तुम्ही एकदी साडी नेसली की तुमचे दागिने साडीच्या मुख्य भागावर मॅच करतील. तुम्ही तुमच्या साडीला पारंपरिक दागिन्यांसह जोडू शकता जे तुम्हाला शोभून दिसेल.

ब्लाउज

तुमच्या साडीला थोडा आधुनिक टच देण्यासाठी तुम्ही एम्ब्रॉयडरी ब्लाउज निवडा जे तुमचा लुक हायलाइट करेल. पारंपरिक लुकसाठी पारंपरिक साधे ब्लाउज देखील निवडू शकता.

केस

पारंपरिक दागिने आणि गजरा यांनी सजवलेला छान केसांचा अंबाडा तुमच्या लग्नाच्या लुकमध्ये भर घालेल.

लग्नाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही तुमची केशरचना साधी ठेवू शकता.

नारायणपेठी साड्यांचे मूळ मराठा काळात आहे. आजही या साड्यांचे ते राजेशाही स्वरूप आहे. त्यामुळे तुमच्या साडीच्या संग्रहात ही साडी आहे याची खात्री करा.