वाढत्या वयातील मुलांसाठी योगासने व आहार

प्रत्येकाचीच आणि खासकरून वाढत्या वयातील मुलांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. कारण जर वाढीच्या वयात मुले सतत आजारी पडली तर त्यांच्या वाढीवर परिणाम होतो.

Story: संतुलन मंत्रा । अंजली पाटील |
24th September 2022, 12:21 Hrs
वाढत्या वयातील मुलांसाठी योगासने व आहार

आहार

 रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या आहाराची आवश्यकता असते. आहार हा जीवनसत्त्वांनी युक्त असावा. पेशींच्या सुदृढतेसाठी विटामिन्स, मिनरल्स व प्रोटिन्स आवश्यक आहेत.

 कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

  ऋतूप्रमाणे फळांचा रोज आहारात समावेश करावा.

  पालेभाज्या व फळभाज्या आहारात असाव्यात.

 सुकामेवा, अंडी, चिकन, मासे यात भरपूर प्रोटीन असते त्याचा आहारात समावेश करावा.

  पाणी भरपूर प्यावे.

 कंदमुळे जसे बटाटा, बीट, गाजर, लसूण यांचा आहारात समावेश करावा.

  दही, ताक यांचा सुद्धा आहारात समावेश करावा.

 उंची वाढविण्यासाठी

 उंची ही अनुवंशिकतेवर अवलंबून असते.

 उंची वाढविण्यासाठी पोषक आहार बरोबरच व्यायामाची आवश्यकता असते.

 व्यायाम हा वाढत्या वयातील मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. नियमित योगासने करणारी मुले नेहमी निरोगी आणि उत्साही असतात.

 योगासने करताना कुठल्याही प्रकारची घाई किंवा शरीराची ओढाताण करू नये. आपल्या शरीराला झेपतील अशी आसने करत जावीत.

 कुठलीही शस्त्रक्रिया झालेली असेल तर आसने लगेच करू नयेत. नंतरही डॉक्टरांच्या सल्ल्याने व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत.

 उंची वाढविण्यासाठी उपयुक्त आसने :

१) ताडासन

२) वृक्षासन

३) त्रिकोणासन

४) पादहस्तासन

५) सुखासन

६) पदमासन

७) पश्चिमोत्तानासन

८) भुजंगासन

९) मयुरासन

१०) गोमुखासन

११) शलभासन

१२) शीर्षासन

१३) सर्वांगासन

१४) हलासन

१५) सूर्यनमस्कार

 वरील सर्व आसने वाढत्या वयातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत.