बर्च क्लब आग दुर्घटनाप्रकरण : लुथरा बंधूंची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढवली

कोहलीला सशर्त जामीन मंजूर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
53 mins ago
बर्च क्लब आग दुर्घटनाप्रकरण : लुथरा बंधूंची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढवली

म्हापसा: गोव्यातील (Goa)हडफडे येथील बर्च बायरोमिओ लेन (Birch by Romeo Lane Club) दुर्घटनाप्रकरणातील क्लबचे मालक सौरभलुथरा आणि गौरव लुथरा (Saurabhand Gaurav Luthra) यांना म्हापसान्यायालयाने ४ दिवसांचीअतिरिक्त पोलीस कोठडी सुनावणीआहे. तर कांदोळीआरोग्य केंद्राचा बनावट नाहरकतदाखलाप्रकरणी संशयितांनीजामीन अर्ज दाखल केला आहे.या अर्जावर २९ डिसेंबररोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात सुनावणीहोणार आहे. तसेचरोमिओ लेनचे गोवा प्रमुख भरतसिंग कोहली याची सशर्त जामीनावरसुटका करण्यात आली आहे.

हणजूण पोलिसांनीसंशयित लुथरा बंधूंना म्हापसान्यायालयात हजर केले असतात्यांना अजून चार दिवस पोलीसकोठडीत ठेवण्याचा आदेशन्यायालयाने दिला.
तरउत्तर गोवा अतिरिक्त जिल्हासत्र न्यायाधीश द्विजपल पाटकरयांनी संशयित भरत सिंग कोहलीयाचा जामीन अर्ज ५० हजार हमीरक्कम आणि तितक्याच रकमेचाहमीदार पेश करण्याच्या अटींवरमंजूर केला.
महिन्याच्यादर सोमवारी हणजूण पोलिसांतहजेरी लावणे, साक्षीपुराव्यांत हस्तक्षेप न करणे,आमिष न दाखवणे,देशाबाहेर न जाणे,पारपत्र न्यायालयातसादर करणे व इतर अटींचाहीत्यात समावेश आहे. संशयितालापोलिसांनी ७ डिसेंबर रोजीअटक केली होती. त्यानंतरतो कोठडीत होता.

जामीनअर्जावार २९ डिसेंबरला सुनावणी
दरम्यान, बर्चबाय रोमिओ लेन क्लबसाठी अकबारीखात्याचा (उत्पादनशुल्क) परवानामिळवण्यासाठी कांदोळी आरोग्यकेंद्राचा बनावट नाहरकतप्रमाणपत्र (एनओसी)वापरल्या प्रकरणातलुथरा बंधूंनी न्यायालयातजामीन अर्ज दाखल केला असून;या अर्जावर २९ डिसेंबररोजी सुनावणी होणार आहे.कांदोळी प्राथमिकआरोग्य केंद्राचे अधिकारीडॉ. रोशन नाझारेथयांच्या तक्रारीवरून म्हापसापोलिसांनी हा गुन्हा नोंदकरीत रोमिओ लेनचे सहमालक अजयगुप्ता याला अटक केली आहे.

हेही वाचा