कॉलेज लाइफमध्ये करा ट्रेंडी फॅशन

कॉलेज लाइफचा काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा काळ असतो. हा आपल्या आयुष्याचा तो टप्पा असतो जिथे आपण नवीन लोकांना भेटतो, आपण खऱ्या जगण्याला सामोरे जातो, जिथे आपण जीवनातील सर्वात महत्त्वाचे धडे शिकतो, आपण आपल्या करिअरच्या दिशेने पाऊल टाकतो. परंतु आपल्या आयुष्यात हे सर्व चालू असताना आपण स्वतः कडे दुर्लक्ष करू शकत नाही. नवीन गोष्टी करून पाहण्याची आणि भविष्यात आपण कधीही करू शकणार नाही अशा गोष्टी एक्सप्लोर करण्याची हीच वेळ आहे.

Story: फॅशन पॅशन | प्राजक्ता पुंडलिक गांवकर |
11th June 2022, 12:54 Hrs
कॉलेज लाइफमध्ये करा ट्रेंडी फॅशन

जे व्हा नवीन फॅशन ट्राय करण्याचा विचार येतो, तेव्हा महाविद्यालयीन जीवन त्याच्यासाठी योग्य टप्पा आहे. हा काळ उत्साहातला आणि तरुणाईतला असल्यामुळे आपल्यात नवीन गोष्टी हाताळण्याची आणि आजमावण्याची ऊर्जा असते. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून तुम्हाला असे वाटेल की फॅशन तुमच्या बजेटच्या बाहेर आहे आणि तुम्ही प्रयोग करण्यासाठी फॅशन तज्ञ नाही आहात. त्यासाठी तुमच्या कॉ0लेजच्या लूकसाठी कपडे घालताना किंवा खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

अॅक्सेसरीज

स्टाईल आणि फॅशन हे फक्त ट्रेंडी कपडे घालण्यापुरतेच नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या अॅक्सेसरीजशी तुमचा लूक जोडता ते देखील आहे. तुम्ही खूप साधे कपडे घालू शकता पण तुमच्या कपड्यांनुसार एक चांगले घड्याळ आणि पादत्राणे. तुमच्या अॅक्सेसरीज कमीत कमी ठेवा, जास्त अॅक्सेसरीज करू नका.

पादत्राणे:

विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण तुमची पादत्राणे ही पहिली गोष्ट आहे जी लोकांच्या लक्षात येते त्यामुळे तुम्ही चांगल्या पादत्राणांच्या जोडीमध्ये गुंतवणूक करा जी मुख्यतः सर्व लूकवर सूट होते तसेच त्या दिवसाच्या तुमच्या अक्टीव्हिटीजनुसार पादत्राणे घाला. जर तुम्हाला खूप फिरावे लागत असेल तर त्या दिवसासाठी उंच टाचा घालणे टाळा. अनकम्फर्टेबल शूज तुमचा सर्वोत्तम दिवस देखील खराब करतील.

तुमच्या शरीराचा प्रकार ओळखा

तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या मैत्रिणीला छान दिसणारी गोष्ट तुमच्यावर चांगली दिसणार नाही किंवा त्याउलट, तुमच्या शरीराचा प्रकार तुमच्या मैत्रिणीपेक्षा वेगळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराचा प्रकार समजून घेणे. प्रत्येकजण परिपूर्ण आकृत्या घेऊन जन्माला येत नाही या वस्तुस्थितीला मान्य करून तुमच्या शरीराचा प्रकार ओळखून त्यानुसार कपडे घाला.

लेयरिंग

डेनिम जॅकेट, स्टोल, श्रग्स, स्कार्फ्स इत्यादी सारख्या तुमच्या पोशाखांमध्ये लेयर जोडा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मिक्स आणि मॅचसह खेळणे आणि तुमचे पोशाख लेयर करणे चांगले आहे. हे तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये वेगळा लुक देईल.

साधेपणात सुंदरता

नवीन ट्रेंड वापरण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वकाही एकत्र करून पहा. जर तुम्हाला नवीन गोष्टी करण्याचा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही फॅशन स्टेटमेंट देखील बनवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती साधी ठेवणे, सोपी म्हणजे क्लासियर. टी-शर्ट वा टॉपसह जीन्सची साधी जोडी, साध्या शूजसह मिडी ड्रेस किंवा साधा कुर्ता आणि पँट घाला. कॉलेजमध्ये दिवसभर आरामदायक असे काहीतरी परिधान करा आणि या साध्या लूकमध्येही तुम्ही खूप स्टायलिश लूक देऊ शकता.

केशरचना

तुम्ही कसे स्टाईल करता याचा तुमच्या एकूण लूकवर खूप परिणाम होतो. त्यामुळे हेअरस्टाइलबाबत काळजी घ्या. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे केस व्यवस्थित आणि स्वच्छ आहेत याची खात्री करा. तुम्हाला तुमच्या केसांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या केसांवर जास्त स्टाइलिंग उत्पादने आणि रसायने वापरू नका कारण यामुळे केसांना दीर्घकाळ नुकसान होईल.