धगधगते काश्मीर; बँक व्यवस्थापकाची हत्या

|
02nd June 2022, 10:35 Hrs
धगधगते काश्मीर;  बँक व्यवस्थापकाची हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गुरुवारी काश्मीरच्या कुलगामध्ये बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय कुमार असे त्या व्यवस्थापकाचे नाव आहे. या हल्ल्यात विजय कुमार यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच काश्मिरी पंडित शिक्षिका रजनी बाला यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

गेल्या तीन दिवसांपासून हत्यांचे सत्र

विजय कुमार हे मुळचे राजस्थानचे रहिवासी होते. कुलगाममधील अरे मोहनपोरा गावात एल्लाकी देहाती बँकेच्या (ईडीबी) शाखेत ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. अलीकडेच मंगळवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या केली होती. बाला या काश्मिरी पंडित होत्या. तसेच बडगाममध्ये तहसील कार्यालयात घुसून सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. मंगळवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या केली होती. बाला या काश्मिरी पंडित होत्या. तसेच बडगाममध्ये तहसील कार्यालयात घसून सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

काश्मीरमध्ये पंडित सुरक्षित नसल्याचा आरोप

भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. ठिकठिकाणी निदर्शनेही करण्यात आली होती दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात असून काश्मीरमध्ये आम्ही सुरक्षित नसल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला होता. तसेच आम्हाला सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, अशी मागणी काश्मिरी पंडितांकडून करण्यात आली आहे.