क्लस्टर विद्यापीठ स्थापना विधेयक

चिकित्सा समितीची उद्या होणार पहिली बैठक

Story: प्रतिनिधी, गोवन वार्ता |
3 hours ago
क्लस्टर विद्यापीठ स्थापना विधेयक

पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) (National Education Policy) अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांंना एकत्रित करून क्लस्टर विद्यापीठे (University) स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सरकारने सादर केलेल्या सार्वजनिक विद्यापीठ  विधेयकाच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या चिकित्सा समितीची पहिली बैठक उद्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्याच्या उच्च शिक्षणात (Higher Education) महत्वाचे बदल करण्याची तरतूद विधेयकात आहे. यामुळे चिकित्सा समितीची बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

एकाच विद्यार्थ्याला एका पेक्षा अधिक विषयात पदवी मिळविणे शक्य व्हावे, यासाठी महाविद्यालयाना एकत्रित करून क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे महाविद्यालयाना स्वत:चा अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणे शक्य होणार आहे. निकाल सुद्धा महाविद्यालयेच जाहीर करतील. यासाठी गोवा सार्वजनिक विद्यापीठ विधेयक पावसाळी अधिवेशनात सरकारतर्फे मांंडले गेले. विरोधकांंच्या मागणीनंंतर विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा निर्णय झाला. जलस्रोत मंंत्री सुभाष शिरोडकर यांंच्या अध्यक्षतेखाली चिकित्सा समिती स्थापन करण्यात आली आहे. अलेक्स सिक्वेरा, कृष्णा साळकर, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, डॉ. देविया राणे व निलेश काब्राल हे चिकित्सा समितीचे इतर सदस्य आहेत.

हेही वाचा