बाणावली समुद्रकिनाऱ्यावर सापडला मृत छोटा डॉल्फिन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
बाणावली समुद्रकिनाऱ्यावर सापडला मृत छोटा डॉल्फिन

बाणावली : (Benaulim) समुद्रकिनाऱ्यावर (Beach) मृतावस्थेतील छोटा डॉल्फिन (Dolphin)  सापडला. लाटांवर तरंगत असताना येथील मच्छीमार फ्रांसिस्को फर्नांडिस (पेले)  (Pele) यांनी त्याला पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढले. 

पेले यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बाणावली समुद्रकिनाऱ्यावर आपण सकाळी फेरफटका मारायला आलो होतो. त्यावेळी किनाऱ्यावर आपल्याला डॉल्फिन तरंगताना दिसला. साधारण १ किलोमीटर समुद्रात  जाऊन आपण त्याची सुटका केली. मात्र, तो मृतावस्थेत होता.  डॉल्फिन नेमका कसा मृत पावला याची आपल्याला माहिती नाही. मात्र, हे दुर्दैवी असून, नेमके कारण शोधून काढणे गरजेचे असल्याचे पेले यांनी सांगितले. 

गेल्या काही वर्षांत छोटे डॉल्फिन समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या आहेत. मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. याचे नेमके कारण शोधून काढणे गरजेचे असल्याचे पेले यांनी सांगितले. 

हेही वाचा