मुलगी

Story: कविता | सोनाली पेडणेकर. वास्को. |
22nd January 2022, 11:15 Hrs

मला असं का वाटावं बरं, 

मुलगी तुला का नको

मुलगी सर्वस्व या जगाची 

तू हे विसरू नको


मुलगी जन्माला आली 

ओझे तिला समजू नको,

तिला प्रेमाने वाढव, 

ती ओझे घेईल हे विसरु नको


तिचे संगोपन करताना 

तिला कमी तू लेखू नको,

ती असते तर घरास 

घरपण असते हे तू विसरु नको


मुलगी मुलगी का झाली 

असे तिला चिडवू नको

कर्तृत्वाने उभे करील 

विश्व हे विसरु नको


तिला काही कमी 

पडू देऊ नको

मुला इतका तिचा वाटा 

असतो घराला हे विसरु नको

                         

ती परक्याचे धन असे 

मनात ठेवू नको

आपलाच तो अंश 

आहे हे विसरू नको


परक्या घरी जाईल म्हणून 

ओझे तिला म्हणू नको

परक्याची लेख तुझ्या घरी 

येईल हे ही विसरु नको