"पान सुपारी विडा" - एक वरदान...

Story: सुप्रिया केतकर |
27th November 2021, 12:01 am
"पान सुपारी विडा" - एक वरदान...

खायचे पान प्रकार : 

१) शिरशी पान- हे पान गोड असते. 

२) काळे पान- हे पान तिखट असते. 

३) नागवेल/ टिकरी पान- हे आकाराने लहान व जास्त औषधी असते. उपयोग: मुखशुद्धी व रक्तशुद्धीसाठी.पान शरिरातील अनेक व्याधींपासुन आपले संरक्षण करते. दातांचे आजार,सर्दी, खोकला, डोकेदुखी, थकवा दूर करण्यासाठी, निद्रानाश दुर करण्यासाठी, बद्धकोष्ठता(Constipation),पचनशक्ती वाढविण्यासाठी,ब्रोंकाइटिस,घाम दुर्गंधी येत असल्यास, अल्सरसाठी,नाकातुन रक्त आल्यास, तोंड आल्यास,तोंडाच्या अल्सरसाठी,ओरल केंसरसाठी,डोळ्यांची जळजळ किंवा लाल होण्याच्या समस्येसाठी,खाजेच्या समस्येसाठी,वजन कमी करण्यासाठी, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी,पुरूष शक्ती वाढविण्यासाठी,मुरुमांच्या त्रासासाठी,केस दुभंगत असतील तर, शरिरातील हानिकारक Bacteria कमी करण्यासाठी व पोटाच्या समस्येसाठी उपयुक्त. ह्यात केल्शियम,प्रोटिन्स,मिनरल्स, कार्बोहाइड्रेट,फायबर, आणि व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. 

२) सुपारी उपयोग: हिरड्या मजबूत करण्यासाठी, दात साफ राखण्यासाठी, पचनक्रिया वाढविण्यासाठी, बद्धकोष्ठता/पोट साफ राखण्यासाठी,शांत झोप लागण्यासाठी,High/Low ब्लड प्रेशर ,ह्रृदय गति नियमित करण्यासाठी, अस्थमासाठी,सिझोफ्रेनिया, तोंड सुके वाटत असल्यास,आवाज सुधारण्यासाठी,मुत्राशय नियंत्रणात ठेवण्यासाठी, मांसपेशींच्या मजबुतीसाठी व मधुमेहावर उपयुक्त. 

३) चुना उपयोग: स्मृती/स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, गर्भधारणेसाठी, नपुंसकतेची समस्या,हाडे मजबूत करण्यासाठी, उंची वाढवण्यासाठी,अनेमिक (हिमोग्लोबिन)कमतरतेवर, त्वचा समस्या, काविळ,मेनोपोज, मोडलेल्या हाडांना पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी,नोर्मल डिलीव्हरीसाठी व स्पोंडेलिसिस समस्येसाठी उपयुक्त. 

४) कात प्रकार: 

१) काळे कात- For industrial purpose. 

२) फिक्का कात - विड्यासाठी विड्यातील चुना व कात यांच्या मिश्रणामुळे तोंड रंगते. उपयोग: काताच्या अंगी स्तंभक धर्म असल्यामुळे जुलाबासाठी,रक्तस्त्रावांत त्याचा चांगला उपयोग होतो. त्याचे चुर्ण/ अर्क अथवा काढा किंवा दालचिनीबरोबर दुसरे उपयोग करतात.घसा बसल्यास,हिरड्या सुजून बसल्यास,लाळ गळू लागली असल्यास,दात किडले असतील तर व ठणकू लागले असतील तर त्याची पुड किडलेल्या ठिकाणी भरावी . साध्या मलमात कात मिसळून ते मलम व्रणावर लावल्यास ते व्रण बरे होतात. 

५) गुलकंद उपयोग: पोटाच्या समस्येसाठी,तोंड आल्यास, घामाची दुर्गंधी, डोळ्यांच्या विकारावर,वजन कमी करण्यासाठी,एसिडिटीसाठी, थकवा दूर करण्यासाठी, ब्लड प्रेशर,ह्रृदयरोगावर, रक्तातील ग्लुकोजचा समतोल राखण्यासाठी,मुरूमांवर व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. 

६) बडिशेप उपयोग: मुखशुद्धी, खोकला, नियमित मासिक पाळीसाठी, त्वचा ग्लो करण्यासाठी, बद्धकोष्ठता, पोट दुखी,अपचन, स्मरणशक्ती,दृष्टी चांगली राखण्यासाठी,एसिडिटी,वजन कमी करण्यासाठी, घश्यात खवखव जाणवत असेल तर,हाता पायांची जळजळ होत असेल तर, स्तनांचा आकार वाढविण्यासाठी व सुडौल करण्यासाठी (दुधा सोबत- त्यात फ्लेवोनाईड एस्ट्रोजन हार्मोन्स आढळतात म्हणून),केलेस्ट्रोल लेव्हल मर्यादित ठेवण्यासाठी,जुलाबासाठी उपयुक्त. बडिशेपमध्ये एनिटोल आणि सिनेओल नावाची तत्व असल्यामुळे ती कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन दुर करण्यास सहाय्यक ठरतात.कारण त्यात एंटिबेक्टेरियल गुण असतात.युरिन इन्फेक्शनसाठी उपयुक्त.बडिशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटेशियम असल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास उपयुक्त ठरते. 

६) ओले खोबरे उपयोग : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास, पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त.खोब-यामध्ये एंटिबेक्टेरियल,एंटि बंगला,एंटी व्हायरल तत्व असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.अति उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास, नाकातून रक्त येत असल्यास,वजन नियंत्रित ठेवण्यास,मेंदुची कार्यक्षमता वाढविण्यास उपयुक्त .कारण त्यात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास उपयुक्त.

(विशेष सुचना :१) विडा चावून पूर्ण खावा कारण त्यात जी लाळ असते ती पचनाला चांगली असते .  त्यामुळे तो अर्धवट चावून थुंकू नये. २) विडा खाऊन झाल्यानंतरच दात घासावे नाही तर दातांवर राप चढतो. )