तिघा मोबाईल चोरट्यांना पेडणे पोलिसांकडून अटक

Story: - |
26th October 2021, 11:34 pm
तिघा मोबाईल चोरट्यांना पेडणे पोलिसांकडून अटक

पणजी : मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला मंगळवारी पेडणे पोलिसांनी अटक केली. 

या प्रकरणी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये चोपडे येथील सिद्धेश खोर्जुवेकर यांच्या गाडीच्या काचा फोडून १.३० लाख रुपयांचे दोन मोबाईलची चोरी करण्यात आली होती.      

पोलिसांना गेल्या तीन महिन्यांपासून या चोरीचा कोणताही सुगावा लागला नव्हता, तथापि पाळत ठेवून पेडणे पोलिसांना मंगळवारी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. संकेत लक्ष्मण चोडणकर (कळंगुट), फुरबू रिंगी सिंगे (कळंगुट, मूळ नेपाळ) आणि मोहन लाल बहादूर थापा (कांदोळी, मूळ नेपाळ) या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेले दोन्ही मोबाईल जप्त केले.      

पोलीस पथकात निरीक्षक दळवी, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, कॉन्स्टेबल सागर खोर्जुवेकर, अर्जुन कलंगुटकर, संदेश वरक, विनोद पेडणेकर यांचा समावेश होता.

हेही वाचा