बांद्यातील बेपत्ता भाऊ म्हापशात सापडले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:37 am
बांद्यातील बेपत्ता भाऊ म्हापशात सापडले

म्हापसा : बांदा (जि. सिंधुदुर्ग) येथून बेपत्ता झालेले सिंघानिया कुमार (१६) चौहान व हसमुख कुमार चौहान (१४) हे दोघे भाऊ  म्हापसा कदंब स्थानकावर मंगळवारी सापडले.       

 या दोघांनी बस स्थानकावरील एका व्यक्तीकडील मोबाईल फोन घेऊन आपल्या आईशी संपर्क साधला. पण, त्यांनी आपण कुठे आहोत ते सांगितले नाही. फोन ठेवल्यानंतर आईने पुन्हा त्या फोनवर संपर्क साधला तेव्हा तिचे बेपत्ता दोन्ही मुलगे म्हापसा बस स्थानकावर असल्याचे समजले. त्यानंतर वडील बाबुराम यांनी म्हापशातील विजय कांबळी या मित्राच्या सहाय्याने दोन्ही मुलांचा शोध घेतला व त्यांना घरी आणले.

शनिवारी बेपत्ता झाल्यानंतर वडील बाबुराम चौहान यांनी बांदा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बांद्यातील एका दुकानातील सीसीटिव्ही फुटेजवरून ते पत्रादेवीच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले होते.