ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन फसवणूक झाल्यास महिलांनी कुठे व कशी तक्रार करावी?सोशल नेटवर्किंगमुळे होणारी महिलांची फसवणूक व त्यावरील उपाय.

Story: समुपदेशन । अॅड. देवता मणेरीकर उमर्ये. |
08th October 2021, 10:23 Hrs
ऑनलाईन फसवणूक

आजच्या या धावपळीच्या युगात वावरत असताना आपण सर्वच पुर्णपणे सोशल नेटवर्किंगवर अवलंबून आहोत आणि यात भर पडली ती डिजीटल इंडिया व करोना कालावधीची. ज्यामुळे स्त्रियासुद्धा यात फरफटल्या गेल्या.

सोशल नेटवर्किंगचे फायदे आहेत, त्याहीपेक्षा त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे तोटे आहेत. सोशल नेटवर्किंगचा वापर करत असता पाऊल अतिशय काळजीपुर्वक टाकणे अनिवार्य आहे. गोपनीयतेचे नियम पाळले पाहिजेत, 'अनोळखी' या नावाने एक हेल्पलाईन २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यावर फोन करुन तक्रार नोंद करू शकतो.

१) लेखी तक्रार देत असल्यास नक्की आपल्यास कधीही असा अनुभव आल्यास लगेच पोलीस तक्रार करणे शहाणपणाचे ठरेल.

२) दुसरा पर्याय आपल्याजवळ आहे तो म्हणजे १५५२६० ही जी हेल्पलाईन १ एप्रिल,२०२१ मध्ये लॉन्च करण्यात आली आहे त्यावर फोन करुन तक्रार करू शकतो.

३) https:/www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकतो. हेल्पलाईन व वेबसाईटवर केलेल्या तक्रारीची २४ तासाच्या आत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलमध्ये सविस्तरपणे नोंद करून घेतली जाते. तक्रारदाराला एसएमएस पाठवला जातो व रेफ्रन्स क्रमांकही दिला जातो. तक्रारदाराला आपली तक्रार झाली आहे व त्याचा तपास कुठे पोहचलाय याची चौकशीसुद्धा येथे करता येते. तसेच बँक संदर्भातील गुन्हा असल्यास बँकेत लेखी तक्रार करावी.

तक्रार करते वेळी कोणत्या गोष्टीचे ध्यान ठेवावे?

१) लेखी तक्रार देत असल्यास नक्की काय घडले याची सविस्तर माहिती द्यावी.

२) ज्या ईमेल किंवा सोशल मीडिया नेटवर्कवरून तुमची फसवणूक झाली असेल त्याची कॉपी पुरव्यांसकट तक्रारीसोबत जोडावी.

३) पोलीस स्टेशनला जाताना सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी दोन्ही घेऊन जाव्यात.

४) ज्या मजकुराच्या माध्यमातून गुन्हा घडलाय तो मजकूर किंवा प्रोफाइलचे स्क्रिनशॉट घ्यावेत.

५) शक्य असल्यास स्क्रिनशॉट URL स्वरूपातील असावी.

६) या सर्व कॉपी पोलिसांकडे तक्रार नोंदवताना डिजिटल आणि प्रिंट दोन्ही स्वरूपात घ्याव्यात.

यानंतर सायबर विभाग तपास कार्यास सुरुवात करुन गुन्हेगाराचा शोध लावते. आपल्यास कधीही असा अनुभव आल्यास लगेचच पोलीस तक्रार करणे शहाणपणाचे ठरते.