अमलीपदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी थिवी रेल्वे स्थानकावर चौघांना अटक


29th July 2021, 12:15 am
अमलीपदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी थिवी रेल्वे स्थानकावर चौघांना अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

मडगाव : कोकण रेल्वे पोलिसांनी अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी केरळ येथील चार संशयितांना अटक केली. त्यांच्याकडील सुमारे ४४ हजारांचा मुद्देमालही ताब्यात घेतलेला आहे. बुधवारी सकाळी थिवी रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.            

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेद्वारे केरळ येथे जाण्यासाठी थिवी रेल्वे स्थानकावर आलेल्या चार संशयितांच्या संशयास्पद हालचालीमुळे कोकण रेल्वे पोलिसांनी त्यांची चौकशी केली व सामानाची तपासणी केली. यावेळी ३९ हजाराचे ६.५ ग्रॅम एमडीएमए, पाच हजार रुपये किमतीचा २० ग्रॅम चरस व सहाशे रुपये किमतीचा सहा ग्रॅम गांजा असा मुद्देमाल त्यांच्याकडे आढळून आला. पोलिसांनी महम्मद अस्लम (२६, रा. तिरुर-केरळ), नदीर्शा के. ए. (२४, रा. थिसूर - केरळ), शफी व्ही. एच. (२७, थिसूर - केरळ), महम्मद उनाईस (२८, रा. मेलापुरम - केरळ) अशी या संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा