पुढील सात दिवस गोव्यात ‘असा’ राहणार उष्णतेचा पारा!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 04:19 pm
पुढील सात दिवस गोव्यात ‘असा’ राहणार उष्णतेचा पारा!

पणजी : राज्यात पुढील सात दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हीट इंडेक्स म्हणजेच जाणवणारे तापमान ४० अंश सल्सिअसपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. तर सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.

शुक्रवारी पणजीत कमाल ३३.७ अंश तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव येथे कमाल ३३.६ अंश तर किमान २५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात २७ एप्रिल ते २ मे दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता देखील खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.