फोनपासून क्षणभरदेखील दूर राहवत नाहीये का ? तुम्हाला नोमोफोबिया तर नाही ना ?

दारू, सिगरेट यांसारख्या अनेक गोष्टींची व्यसने माणसाला असतातच. याच यादीत स्मार्टफोनच्या व्यसनाचा समावेश होतो. इतर व्यसनांसारखे स्मार्टफोनच्या व्यसनाचे दुष्परिणाम ही असतात. थोडा वेळ फोनपासून दूर राहिल्यानंतर शरीर थरथर कापू लागते, घाम फुटतो आणि अस्वस्थ वाटू लागते. कधीकधी हृदयाचे ठोके देखील असामान्य होऊ शकतात. या प्रकारास नोमोफोबिया असे म्हणतात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 03:17 pm
फोनपासून क्षणभरदेखील दूर राहवत नाहीये का ? तुम्हाला नोमोफोबिया तर नाही ना ?

पणजी : स्मार्टफोन हा आजकाल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. बऱ्याचदा क्षणभरही फोनपासून दूर राहणे कठीण होऊन बसते. मोबाईल जवळ नसला तरी चिंता सुरू होते. अशा प्रकारची समस्या हलक्यात घेऊ नये. वैद्यकीय भाषेत याला नोमोफोबिया म्हणतात, हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. चला जाणून घेऊया नोमोफोबिया म्हणजे काय आणि त्याचे तोटे काय आहेत...Why nomophobia is making headlines - The Economic Times 

फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल फोनचा फोबिया नाही.पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला फोनपासून दूर राहिल्यामुळे भीती किंवा चिंता वाटू लागते, त्यांना त्रास होऊ लागतो, श्वासोच्छवासाचा पॅटर्न बदलतो आणि इतर अनेक लक्षणे दिसू लागतात. त्याचबरोबर कोणत्याही समस्येचा विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि हाताळण्याच्या पद्धतीवरही परिणाम होतो. या स्थितीस नोमोफोबिया म्हणतात. Nomophobia : Mobile Phone Uses Lead To Health Risk - SHYAM SINGH | torial

जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्राइमरी केअरमध्ये २०१९ साली प्रकाशित झालेल्या एका लेखात केलेल्या या मानसिक स्थितीच्या वर्णनानुसार. नोमोफोबियाच्या आधी व्यक्तीमध्ये चिंता, तणाव यासारख्या अनेक मानसिक स्थिती वाढू लागतात. चिंता आणि तणावाव्यतिरिक्त, नोमोफोबियाची इतर अनेक लक्षणे असू शकतात. थोडा वेळ फोनपासून दूर राहिल्यानंतरही शरीर थरथर कापू लागते, घाम फुटतो आणि अस्वस्थ वाटू लागते. कधीकधी टाकीकार्डिया म्हणजेच कधी कधी हृदयाचे ठोके असामान्य रीतीने पडतात. nomophobia - song and lyrics by The Hanyaks | Spotify

२०२० साली राबवण्यात आलेल्या एका अभ्यासात फोनपासून दूर राहिल्यामुळे होणाऱ्या चिंतेबाबत संशोधन करण्यात आले. यात फोनशी असणारे आकर्षण या रोगास जन्म देऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याचबरोबर या रोगाने बाधित झालेली व्यक्ती आपल्या भावना इतरांसोबत व्यक्त करू शकत नाही. नोमोफोबियाला अद्याप अधिकृतपणे मानसिक विकार मानले गेलेले नाही, त्यामुळे त्यावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, काही विशिष्ट प्रकारच्या थेरपी आणि समुपदेशनाने या फोबियावर मात करता येते. त्याची लक्षणे देखील सुधारू शकतात. ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब मानसोपचारतज्ञाकडे जावे.Nomophobia: fear of being left without a mobile phone or computer, symptoms  of a phobia, fear of getting your phone dirty


सदर लेख फक्त माहितीपर असून, कोणत्याही आरोग्यविषयक सल्ल्यासाठी तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा 

हेही वाचा