अनोख्या पद्धतीत टीम इंडियाची जर्सी लाँच; रोहितही झाला हैराण

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
06th May, 07:20 pm
अनोख्या पद्धतीत टीम इंडियाची जर्सी लाँच; रोहितही झाला हैराण

धर्मशाला : टी-२० विश्वचषक २०२४ साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. टीम इंडियाची जर्सी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून धर्मशालाच्या पर्वतरांगांमध्ये लाँच करण्यात आली. 

टीम इंडियाची नवीन जर्सी अप्रतिम दिसत आहे. जर्सीच्या बाही भगव्या रंगाच्या आहेत आणि त्याशिवाय त्याचा रंग निळा आहे. जर्सी लॉन्च करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव दिसत आहेत. हेलिकॉप्टरमधून जर्सी आल्याचे पाहून हे तिन्ही खेळाडू आश्चर्यचकित झाले आहेत.

आदिदास टीम इंडियाच्या जर्सीचा प्रायोजक आहे. ही जर्मन कंपनी २०२८ पर्यंत टीम इंडियाच्या जर्सीची प्रायोजक असेल. यासाठी Adidas ने ३५० कोटी रुपये दिले आहेत.