प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यास ‘आयएचसीएल’ ‘वसुंधरा’ दिनी कटिबद्ध

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
26th April, 02:49 pm
प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यास ‘आयएचसीएल’ ‘वसुंधरा’ दिनी कटिबद्ध

प्लास्टिक बाटल्यांऐवजी हॉटेल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक काचेच्या बाटल्या.

पणजी : इंडियन हॉटेल्स कंपनी या गोव्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनी आणि पर्यटन क्षेत्रातील अग्रणी कंपनीने वसुंधरा दिन २०२४ च्या निमित्ताने पर्यावरणीय कार्याकरिता आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. ‘प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक’ अशी या वर्षीची संकल्पना असून आयएचसीएल, गोवा ही कंपनी आपला शतकानुशतकांचा जुना वारसा पुढे नेत आहे. त्यासाठी कंपनीने आपल्या पथ्य या ईएसजी प्लस ही फ्रेमवर्क तयार केली आहे, ज्याद्वारे आयएचसीएल विश्वास, जागरूकता आणि आनंद या मूळ मूल्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात, आयएचसीएल, गोवाने एकेरी वापर असलेल्या प्लास्टिकला टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. या उपक्रमांतर्गत प्लास्टिक स्ट्राचा वापर कमी करत त्याजागी कागद व बांबूपासून बनवलेल्या स्ट्रा, तसेच प्लास्टिकने गुंडाळलेल्या स्नानकक्षातील सुविधा बदलणे व खोल्यांच्या चाव्या ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर चालू केला आहे आणि तसेच पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या जागी प्रक्रिया केलेले पाणी भरलेल्या पुनर्वापर करता येणाऱ्या काचेच्या बाटल्या वापरल्या जातील असे बाटल्या भरणारे प्लांट्स उभारले जात आहेत.

समुदाय, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करताना शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रवास आणि पर्यटन क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आयएचसीएल, गोवा सातत्याने जबाबदार पर्यटन पद्धती राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे, ज्याद्वारे आम्ही राज्यातील पर्यटन उद्योगात एक आदर्श होऊ शकतील अशा सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी सतत नवनवीन प्रयत्न करत आहोत. _रंजीत फिलीपोस, वरिष्ठ उपाध्यक्ष, आयएचसीएल गोवा