उन्हाळी हंगामासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th May, 08:29 pm
उन्हाळी हंगामासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

मडगाव : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेशी समन्वय साधून गाडी क्रमांक ०११५८/०११५७ मडगाव जंक्शन- पनवेल - मडगाव जंक्शन व गाडी क्रमांक ०११५९/०११६० पनवेल - सावंतवाडी रोड - पनवेल या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्र. ०११५८ मडगाव जंक्शन - मडगाव जंक्शन येथून पनवेल विशेष सोमवार ६ मे रोजी ६ वा. सुटेल व ही गाडी त्याच दिवशी १८.५० वा. पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. ०११५७ पनवेल - मडगाव जंक्शन ही गाडी ८ मे रोजी पनवेल येथून ४ वा. सुटेल व मडगाव जंक्शनला त्याच दिवशी १७ वा. पोहोचेल.

ही २० डब्यांची गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबेल.

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल - सावंतवाडी रोड स्पेशल पनवेल येथून सोमवार, ६ मे रोजी २० वा. सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वा. सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्र. ०११६० सावंतवाडी रोड - पनवेल विशेष गाडी सावंतवाडी रोड स्थानकावरून ७ मे रोजी १६ वा. सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी ३ वा. पनवेलला पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.

या गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करावे. प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.