मतदानाची दुसरी फेरी : १३ राज्यांमधील ८८ जागांवर मतदान शांततेत सुरू, मतदारांमध्ये उत्साह.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधींसह अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 04:06 pm
मतदानाची दुसरी फेरी : १३ राज्यांमधील ८८  जागांवर मतदान शांततेत सुरू, मतदारांमध्ये उत्साह.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १३  राज्यांमधील ८८  जागांवर आज मतदान होत आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आज ज्या ८८  जागांवर मतदान होत आहे त्यामध्ये केरळमधील सर्व २० , कर्नाटकातील १४ , राजस्थानमधील १३ , महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातील सहा, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड आणि प. बंगालमध्ये जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी तीन आणि त्रिपुरातील एका जागेचा समावेश आहे.

दुपारी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी 

आसाम ६०.३२ टक्के, बिहारमध्ये ४४.२४ टक्के, छत्तीसगढमध्ये ६३.३२ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ५७.७६ टक्के, कर्नाटकात ५०.९३ टक्के, केरळमध्ये ५१.६४ टक्के, मध्यप्रदेशमध्ये ४६.५० टक्के, महाराष्ट्रात ४३.५० टक्के,मणिपूरमध्ये ६८.४८ टक्के, राजस्थानमध्ये ५०.२७ टक्के, त्रिपुरा ६८.९२ टक्के, उत्तर प्रदेश ४४.१३ टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये ६०.६० टक्के मतदान पार पडले. 

हेही वाचा