Goan Varta News Ad

देशात ‘बर्ड फ्लू’मुळे पहिला मृत्यू

|
22nd July 2021, 02:19 Hrs
देशात ‘बर्ड फ्लू’मुळे पहिला मृत्यू

देशात ‘बर्ड फ्लू’मुळे पहिला मृत्यू
नवी दिल्ली :
बर्ड फ्लूमुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या ११ वर्षीय मुलावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. हरयाणातील एका ११ वर्षीय मुलाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात २ जुलै रोजी भरती करण्यात आले होते. मुलाला ताप आणि खोकला अशी लक्षणे होती.  मुलाच्या चाचण्या करण्यात आल्या, ज्यात त्याला एविएन इन्फ्लुएन्जा म्हणजेच, बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.