‘कुंभमेळा’फेम मोनालिसा फरमान खानच्या प्रेमात

कुटुंबाचा प्रेमसंबंधांना विरोध : प्रियकरासह केरळमध्ये घेतला आश्रय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
‘कुंभमेळा’फेम मोनालिसा फरमान खानच्या प्रेमात

तिरुवनंतपुरम : कुंभमेळ्यादरम्यान (Kumbhmela) सोशल मीडियावर प्रचंड गाजलेली इंदूरची मोनी भोसले उर्फ ​​मोनालिसा (Monalisa) हिने तिरुवनंतपुरम येथील थंपानूर पोलीस ठाण्यात (Kerala Police) आश्रय घेतला आहे. प्रियकर फरमान खान (Farman Khan) याच्यासोबत ती तिथे आली होती. दीड वर्षापूर्वी फेसबुकवर सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमसंबंधांना दोन्ही कुटुंबांनी विरोध केला होता. त्यामुळे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून या दोघांनी केरळमध्ये धाव घेतली. कुंभमेळ्यादरम्यान, ‘पिंगट डोळे असलेली माळा विकणारी तरुणी’ म्हणून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

मोनी ही मध्य प्रदेशातील इंदूरची मूळ रहिवासी आहे, तर फरमान खान हा महाराष्ट्राचा आहे. मोनीने पोलिसांना सांगितले की, तिचे वडील तिच्यावर दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र तिला फरमानसोबतच राहायचे आहे. ‘पूवार’ येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आली असताना, ही अभिनेत्री आपल्या प्रियकरासह पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या तक्रारीनंतर, तिचे वडील जयसिंग भोसले यांना थंपानूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. मोनीला १८ वर्षे पूर्ण झाली असल्याने तिला कोणासोबत राहायचे याचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे, हे पोलिसांनी तिच्या कुटुंबाला समजावून सांगितले. त्यानंतर मोनी आपल्या प्रियकरासोबत निघून गेली.

अभिनय, मॉडेलिंगमध्ये मोनी सक्रिय...

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यादरम्यान मोनी सोशल मीडियाच्या नजरेत भरली होती. त्यानंतर, मनोज मिश्रा दिग्दर्शित ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या बॉलिवूड चित्रपटात मोनालिसा मुख्य नायिकेची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर आली होती. चित्रपटांसोबतच ती मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. ‘बॉबी चेम्मनूर ज्वेलरी’ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मोनालिसाचे केरळमधील आगमनही चर्चेचा विषय ठरले होते.

हेही वाचा