अमेरिका-इस्रायल बरोबरचे युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या तीन अटी

राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला इशारा; विजय मिळवल्याचा ट्रम्प यांचा दावा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
अमेरिका-इस्रायल बरोबरचे युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या तीन अटी

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिक-इस्रायल आणि इराणमधील (USA-Israe and Iran) युद्धाला १३ दिवस पूर्ण होत असताना इराणने युद्ध थांबवण्यासाठी तीन ठोस अटी मांडल्या आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर  पोस्ट करत या अटी जाहीर केल्या. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मात्र अमेरिका युद्ध जिंकत असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान  यांनी सांगितले की, रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करून इराणने पुन्हा एकदा शांततेबद्दलची आपली बांधिलकी व्यक्त केली आहे. मात्र, हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या तीन प्रमुख अटी

इराणने युद्ध समाप्त करण्यासाठी खालील अटी मांडल्या आहेत.

इराणच्या “वैध अधिकारांना” आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी.

युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी.

भविष्यात इराणवर पुन्हा हल्ला होणार नाही याची ठोस आंतरराष्ट्रीय हमी द्यावी.

यु्द्धात विजय मिळवल्याचा ट्रम्प यांचा दावा

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी अमेरिकेने या युद्धात आधीच विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र, मोहीम पूर्ण होईपर्यंत अमेरिकेचे सैन्य तैनात राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

१,२०० हून अधिक मृत्यू

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर दोन्ही बाजूनी मिसाइल व ड्रोन हल्ले होत असून आतापर्यंत सुमारे १,२०० जणांचा मृत्यू झाला आहे.

तेलपुरवठ्यावर परिणाम

युद्धामुळे होर्मुझ (Strait of Hormuz) समुद्रधूनी परिसरात तेलवाहू जहाजांवर हल्ले झाले आणि काही काळ मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि तेलाचे दर झपाट्याने वाढले.

या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून होणारी तेल आयात वाढवली असून, मार्चच्या पहिल्या ११ दिवसांत ती सुमारे १.५ दशलक्ष बॅरल प्रति दिन पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा