अमेरिकेत पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार भारतीयावर १० लाख डॉलर्सचे बक्षीस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
57 mins ago
अमेरिकेत पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार भारतीयावर १० लाख डॉलर्सचे बक्षीस

वॉशिंग्टन : अमेरिकेतील (USA)  फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI)  पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार असलेला भारतीय नागरिक (Indian citizen) भद्रेशकुमार चेतनभाई पटेल याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास १० लाख डॉलर्सपर्यंत बक्षीस जाहीर केले आहे.

२०१५ साली अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील हॅनोव्हर येथील डंकिन स्टोअरमध्ये पत्नी पालक पटेल हिची हत्या केल्याचा आरोप पटेलवर आहे. दोघेही त्या स्टोअरमध्ये काम करत होते. या घटनेनंतर पटेल फरार झाला आहे. गेली ११ वर्षे तेथे त्याचा शोध घेण्यात येत आहे.  

२०१७ पासून त्याचा समावेश एफबीआयच्या १० ‘मोस्ट वॉन्टेड’ फरारी यादीत आहे. यापूर्वी या प्रकरणी २.५ लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र; आता ते वाढवून १० लाख डॉलर्स करण्यात आले आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल याची माहिती देऊन सहकार्य करणाऱ्याला ही रक्कम मिळणार आहे. भद्रेशकुमार हा मूळ गुजरात येथील आहे

हेही वाचा