लाटंबार्से येथील प्रतीक्षा चननकर.

धडपडीतून जनहिताचा वसा घेतलेल्या लाटंबार्से येथील रणरागिणीच्या कार्याविषयी जाणून घेवू

Story: करोनाकाळातील रणरागिणी |
17th July 2021, 06:14 pm
लाटंबार्से येथील प्रतीक्षा चननकर.

एकत्र कुटुंबात असल्याने मुलांच्या जबाबदाऱ्या आणि घरातील इतर कामे करणारी एक गृहिणी अशी ओळख सौ. प्रतीक्षा चननकर यांची होती. पण २०१६ पूर्वी प्रतीक्षा चननकर लाटंबार्सेतील एका क्लबची सदस्य झाल्या.  हा क्लब गावातील वेगवेगळी कामे पार पाडत असे.  प्रतीक्षा यांनी पूजा प्रभू गावकर, बीआरपी- डिचोली यांची भेट घेतली तेव्हा त्यांना स्वयं सहाय्य गटाविषयी समजले. बचत गटांच्या कल्पना आणि संकल्पनेविषयी अधिक माहिती आणि ज्ञान आत्मसात केल्यावर त्यांनी काही महिलांना सोबत घेवून १० ऑक्टोबर, २०१६ रोजी ' श्री वरद विनायक बचत गट ' स्थापन केला. 

त्यानंतर पुढच्याच वर्षी त्या समुदाय संसाधन अधिकारी बनल्या. सी.आर.पी म्हणून त्यांनी विविध कामे हाती घेतली आहेत आणि महिलांसाठी रोजीरोटी निर्माण करण्याच्या विविध संधी निर्माण केल्या.

 सीआरपी म्हणून त्यांने बचत गटांविषयी जनजागृती करण्यास तसेच नवे बचत गट स्थापन करण्यासही सुरुवात केली.  त्यांनी लाटंबार्सेत सुमारे १० बचत गट आणि ४ ग्रामसंघटना स्थापन केल्या.  पशुसंवर्धन विभागाकडून बचत गटातील सदस्यांकरता पशुपालन योजना लागू केली.  या योजनेद्वारे  पोल्ट्री कार्यशाळा घेऊन लाटंबार्से , पिळगाव, मये आणि कुडणे इथल्या लोकांसाठी रोजीरोटी मिळविण्याच्या संधी निर्माण केल्या.

 या योजनेबरोबरच त्यांनी दोन महिलांना पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू गाय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.  कृषी विभागाबरोबरच तिने लाटंबार्से, मये , पिळगाव आणि म्हावळींगे येथे डिचोली प्रभागामध्ये वर्मी-कंपोस्ट प्रकल्पाचे १२ युनिट स्थापन केले आणि पुरेशा विक्रीसह ते ती सहजतेने चालवित आहेत.

 कोविड १९ महामारी आणि लॉकडाऊन

 २०२० च्या कोविडच्या संकटात सर्व देशभर असलेल्या लॉकडाऊनचा गोवा राज्यावरही परिणाम झाला. याप्रकारच्या लॉकडाऊनचा कधी कुणी विचारही केला नव्हता. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या परिणामांसाठी कुणी तयारीही नव्हते.संपूर्ण लॉकडाऊन लादल्यामुळे, लोक अचानक ओढावलेल्या परिस्थितीचे वास्तव स्वीकारण्यास असमर्थ होते.  हजारो बेरोजगार झाले.  गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रतीक्षा चननकर यांनी रेडक्रॉस कम्युनिटी आणि फेडरल बँक, म्हापसा यांच्या मदतीने दररोज आहार, सॅनिटायझर्स व इतर वस्तूंचे गरजू लोकांमध्ये वाटप केले.  त्यांच्या एका विनंतीने बचत गटांमधील लोकांनी या उदात्त कार्याला हातभार लावला.    सुमारे ३५ गरजू कुटुंबियांना आवश्यक त्या प्रमाणात मदत केली.  त्यांनी परिसरातील लोकांपर्यंत स्पोर्ट्स क्लबला वॉकर, टॉयलेट खुर्च्या, जंतुनाशक लिक्विड, सॅनिटायझर्स, वैद्यकीय किट इ. साधने पुरवली.

 गरजू व्यक्तीला देण्यासाठी त्यांच्या घरी बचत गट सदस्यांसह किराणा आणि आवश्यक वस्तूंचे पॅकेजिंग होत असे . त्यांनी धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरता येण्यासारखे फेस मास्क बनवण्याचे ऑर्डर घ्यायला सुरूवात केली.  आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार सुव्यवस्थित आणि एकसमान पद्धतीने मास्क तयार होतील याची खात्री करुन तिने कापड व साहित्य विकत घेतले.  

कोविड लसीकरण शिबिर, टीका-उत्सव पंचायत व आरोग्य विभागाने आखले होते, त्यामध्ये कासारपाल - लाटंबार्सेच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला.  दोन शिबिरे घेण्यात आली, त्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८५ गावकाऱ्यांना  लाडफे गावात लस दिली गेली आणि त्यानंतर ८० जणांना कासारपाल गावात लस दिली गेली 

 त्यांना भविष्यातील योजनांबद्दल विचारणा केली असता त्या म्हणतात की करोनाची सद्य परिस्थिती बदलल्यावर डिचोलीच्या लोकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची इच्छा आहे.

(गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्था (GIPARD) यांच्या सौजन्याने.)