पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा

अविवाहित असल्याचे भासवून युवतीला लाखोंचा गंडा


23rd June 2021, 12:08 am
पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा

प्रतिनिधी । गोवन वार्ता
मडगाव : लग्न झालेले असतानाही अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणे व लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दक्षिण गोव्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
संशयित पोलिस उपनिरीक्षकाने पीडित युवतीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवून त्यानंतर तिला लाखो रुपयांचा गंडा घातला. लग्न झालेले असतानाही संशयिताने पीडित महिलेशी खोटे बोलून लग्न न झाल्याचे सांगितले. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचारही केले. पीडितच्या तक्रारीनंतर या प्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकात भा.दं.सं.च्या कलम ३७६, ४२० व अन्य कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार युवतीने सदर उपनिरीक्षकाने आपल्याला लाखो रुपयांना गंडवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फेसबुवकरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपण अविवाहित असल्याचे भासवून संशयित उपनिरीक्षकाने मैत्री करून तक्रारदार युवतीकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकिस पुढील तपास करत आहेत. पुढील काही दिवसांत खात्याअंतर्गत संशयित उपनिरीक्षकाविरोधात निलंबनाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा