कोलवाळ जेलगार्डचा करोनामुळे मृत्यू

कारागृहातील तीन कर्मचारी व दहा कैद्यांनाही करोनाची बाधा


06th May 2021, 11:56 pm
कोलवाळ जेलगार्डचा करोनामुळे मृत्यू

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एका जेलगार्ड कर्मचार्‍याचे करोनामुळे निधन झाले. कारागृहातील तीन कर्मचारी व दहा कैद्यांना करोनाची बाधा झाली आहे. मृत पावलेला जेलगार्ड वास्कोमधील होता. तब्येत चांगली नसल्याने तो २० दिवसांपासून कामावर येत नव्हता. नंतर करोनाची बाधा झाल्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कारागृहातील कर्मचारी व कैद्यांना करोनाची बाधा होत आहे. सध्या कारागृहातील दहा कैदी व तीन कर्मचारी बाधित आहेत. कर्मचारी गृह विलगीकरणात तर कैद्यांना कारागृहातील विशिष्ट विभागात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कारागृहातील कर्मचार्‍याचे उपचारा दरम्यान इस्पितळात करोनामुळे निधन झाल्याच्या वृत्ताला तुरूंग महानिरीक्षक श्रीनेत कोठवाळे यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा