म्हापसा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८६ टक्के निकाल

समाबानो खान ८८.५ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd April, 08:10 pm
म्हापसा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचा ८६ टक्के निकाल

म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती, गोवा’ संचालित श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावीच्या नवव्या तुकडीचा निकाल ८६ टक्के लागला असून, समाबानो हाफिझ खान ही विद्यार्थिनी ८८.५ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम आली, तर सानिया समीर अहमद ही विद्यार्थिनी ८७ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.
वाणिज्य शाखेत आरिफ रफिक शेख (७६ टक्के) व फातिमा अली अझमत खातून (७३ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत सुजल नागेश च्यारी (८० टक्के) व समृद्धी रामनिवास विश्वकर्मा (७६ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना विशेष श्रेणी, पंधरा जणांना प्रथम श्रेणी, एकोणतीस जणांना द्वितीय श्रेणी, तर सात जणांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.
कोणत्याही विषयाच्या खासगी शिकवणीशिवाय विद्यार्थ्यांनी आचार्य वर्गाच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेल्या यशाबद्दल सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे तसेच आचार्य व आचार्येतर वर्गाचे ‘विद्या भारती, गोवा’ चे तथा विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर, व्यवस्थापक पुरुषोत्तम कामत, प्राचार्य गजानन मांद्रेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र पेडणेकर, माजी पालक संघटनेचे अध्यक्ष धर्मानंद नाईक, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साळगावकर यांनी अभिनंदन केले आहे.