आठ लाखांच्या मद्यसाठ्यासह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सासष्टी अबकारी खात्याची कारवाई


26th April, 06:55 pm
आठ लाखांच्या मद्यसाठ्यासह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जप्त केेलेल्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स भरलेल्या ट्रकसह अबकारी खात्याचे अधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : सासष्टी अबकारी विभागाच्या पथकाकडून कुंकळ्ळी आयडीसी येथे ८.४१ लाखांचा ३,३४६ लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत २५ लाखांचा ट्रक व ८.४१ लाखांची दारू, असा ३३.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सासष्टी अबकारी खात्याचे निरीक्षक शांबा नाईक यांच्या नेतृत्वाखाली संकेत साखरदांडे व नीलेश नाईक यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये सासष्टी अबकारी विभागाकडून दारूच्या बॉक्सनी भरलेला ट्रक आढळून आला. बेकायदेशीररीत्या मद्याची वाहतूक केली जात असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २५ लाख रुपये किमतीचा ट्रक, ८ लाख ४१ हजार ७१० रुपये किमतीची ३,३४६ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.            

हेही वाचा