मनोविश्लेषक, साहित्यिक सुधीर काकर यांचे निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 12:09 am
मनोविश्लेषक, साहित्यिक सुधीर काकर यांचे निधन

सुधीर काकर

मडगाव : जागतिक किर्तीचे मनोविश्लेषक तथा साहित्यिक सुधीर काकर यांचे बाणावली येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कॅथरिना, मुलगा राहुल, मुलगी श्वेता असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
सुधीर काकर यांचा जन्म नैनीताल येथे १९३८ साली झाला. गुजरात येथे मेकॅनिकल इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर त्यांनी जर्मनी येथे मास्टर पदवी घेतली. हार्वर्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर १९७५ मध्ये ते भारतात आले व दिल्लीत मनोविश्लेषक म्हणून कार्य सुरू केले. द इनर वर्ल्ड, द इंडियन अशी विविध पुस्तके त्यांनी लिहिली. याशिवाय इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यासह परदेशातील युनिव्हसिटींकडूनही त्यांना विविध पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी गोवा युनिव्हर्सिटीमध्ये कोसंबी व्हिजिटींग रिसर्च प्रोफेसर म्हणून २०१३ साली काम केले आहे. इंडियन सायकोअॅनालिस्ट सोसायटीसह विविध मनोविश्लेषक संस्थांनी व देशभरातील मान्यवरांकडून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.