वाळपईत ९ प्रभागांतून २३ उमेदवार रिंगणात


06th March 2021, 11:59 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता
वाळपई : नगरपालिका निवडणुकीसाठी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दहापैकी नऊ प्रभागांमध्ये २३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. प्रभाग २ मधून तिरंगी तर प्रभाग ९ व ४ मधून चौरंगी लढत होणार आहे. इतर प्रभागांत दुरंगी लढत होणार असून शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्रमांक आठमधून निर्मला साखळकर यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारांची अंतिम यादी पुढील प्रमाणे.
प्रभाग १ अनिल काटकर, देवेंद्र गावकर, २ रामदास शिरोडकर, रमेश झर्मेकर, ३ उमेश गुळेलकर, ४ प्रसन्ना गावस, मीलन गावस, रेश्मा गावस, राजश्री गावस, ५ अब्दुल मुनीर बेग शेख इद्रीस, ६ शराफत खान, इस्माईल खान, ७ सर्फराज सय्यद, दीपा मांद्रेकर, ९ धर्मेंद्र साळुंखे, शेख साहेब, जी अली खान, शिराज सालिया, नसिरुद्दीन बुरहानुद्दीन, १० श्वेता काणेकर, सेहझीन शेख.

हेही वाचा