नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज दाखल

कुंकळ्ळी पालिकेसाठी सोळा अर्ज


03rd March 2021, 11:35 pm
नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज दाखल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कुंकळ्ळी नगरपालिकेसाठी बुधवारी दिवसभरात १६ अर्ज दाखल झाले आहेत. नावेली जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एडविन कार्दोज व मटिल्डा डिसिल्वा यांनी प्रत्येकी दोन अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
कुंकळ्ळी नगरपालिकेसाठी २६ रोजी दोन, २७ रोजी तीन, १ मार्च रोजी बारा, २ मार्च रोजी एकेचाळीस, तर बुधवारी सोळा, असे एकूण ७४ अर्ज दाखल झाले आहेत. राज्यात कुंकळ्ळी पालिकेसाठीच एवढ्या जास्त संख्येने अर्ज दाखल झालेले आहेत. बुधवारी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून एका उमेदवाराने दोन अर्ज सादर केल्याने अर्जसंख्या १६ झाली आहे. नावेली जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. बुधवारी एडविन कार्दाेज व मटिल्डा डिसिल्वा यांनी प्रत्येकी दोन अर्ज सादर केले आहेत. भाजपकडूनही नावेली जिल्हा पंचायतीसाठी अर्ज सादर केला जाणार असून सत्यविजय नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे.    

हेही वाचा