राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत नेहा उपाध्ये हिचे सुयश

ऑनलाइन अखिल भारतीय स्पर्धेत मराठी विभागात नेहा उपाध्ये देशात द्वितीय पारितोषिक विजेती ठरली.

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th October 2020, 12:30 am
राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत नेहा उपाध्ये हिचे सुयश

पणजी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती आणि विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर दोन मिनिटांत विचार मांडणे या ऑनलाइन अखिल भारतीय स्पर्धेत मराठी विभागात कुमारी नेहा उपाध्ये देशात द्वितीय पारितोषिक विजेती ठरली.

 नेहा उपाध्येचे माध्यमिक शिक्षण विद्या भारतीचे स्कूल श्री गणेश हायस्कूल येथे पूर्ण झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण शांतादुर्गा हायर सेकंडरी, डिचोली येथे घेत आहे. राष्ट्रीय पातळी वरील स्पर्धेत मराठी विभागात द्वितीय येण्याचा मान नेहाला मिळाल्यामुळे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. नेहा हिने बाल कीर्तनकार म्हणूनही यापूर्वी गोव्यात व गोव्याबाहेर आपला ठसा उमटवला आहे. तसेच यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले आहे.